चांद्यात अवकाळीचा अनेकांना फटका... नुकसानग्रस्त भागाला सुनीता गडाख यांची भेट...

चांदा : अवकाळी पावसाने सगळीकडेच हाहाकार उडवून दिला आहे. चांद्यातील नुकसानग्रस्त भागाला माजी सभापती सुनीता गडाख यांनी भेट दिली. नुसकानग्रस्त कुटुंबांना त्यांनी मानसिक आधार देत नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

मागच्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने बहुंतांश जिल्ह्यातील शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करावे अशी मागणी होत आहे. 


नेवासे तालुक्यातील चांदा परिसरात अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. चांद्यातील रस्तापूर रस्ता, पुंड वस्ती, दरंदले वस्ती, बोरुडे वस्ती अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने नुकसान झालेेले आहे. 


या नुकसानीची माहिती होताच माजी सभापती सुनीता गडाख यांनी भेट दिली. या नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन गडाख यांनी दिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य रावसाहेब दहातोंडे, बाळासाहेब जावळे, बंटी कदम, सचिन जावळे, अजित बागवाले आदी उपस्थित होते.


राज्यातील मध्य महाराष्ट्रात नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर. तर मराठवाडामध्ये छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव या भागात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 


विदर्भात बुलडाणा, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या परिसरात यलो अलर्ट देण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post