पंकजा मुंडे यांना मोठा धक्का...

बीड :आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये मविआने बाजी मारली आहे.


आंबाजोगाई बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये एकूण आठरा जागांपैकी तब्बल 15 जागांवर मविआने बाजी मारली आहे. तर तीन जागांवर भाजपचा विजय झाला आहे. 

ही निवडणूक मविआच्या पॅनलने धनंजय मुंडे यांच्या नेतृत्वाखाली लढवली होती. या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडे व धनंजय मुंडे यांची प्रतिष्ठा पणाला लागल्याने या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. 

अखेर निवडणुकीचा निकाल हाती आला असून, भाजपचा पराभव झाला आहे. हा पंकजा मुंडे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post