राहुरी : राहुरी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत एकूण १८ पैकी १६ जागांवर सत्ताधारी महाविकास आघाडीने स्पष्ट बहुमत मिळविले आहे. या निवडणुकीत विखे-कर्डिले गटाचा दारुण पराभव झाला आहे.
राहुरी महाविद्यालयात शुक्रवारी सकाळी आठ ते सायंकाळी चार मतदान पार पडले. त्यानंतर मतमोजणी झाली. यामध्ये विरोधी भाजपा प्रणित विकास मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले.
राहुरी बाजार समितीत सत्ताधारी तनपुरे गटाने सत्ता कायम राखली. विरोधी भाजपा प्रणित विकास मंडळाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावे लागले

Post a Comment