माघारी अगोदरच नागवडेंनी केले उमेदवार निश्चित.... आमदार बबनराव पाचपुते यांना मानणारा एक गट नाराज....

अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीची प्रक्रिया चालू झाली आहे. या निवडणुकीच्या माघारीची प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच आज आढळगाव येथे राजेंद्र नागवडे यांनी काही उमेदवार जाहीर केले असल्यामुळे पाचपुते गटाला माणणारे  कार्यकर्ते नाराज झाले आहेत. परिणामी या निवडणुकीत मागासवर्गीय मतांचा फटका आ. पाचपुते व नागवडे गटाला बसणार हे मात्र निश्चित आहे. 


श्रीगोंदा बाजार समिती च्या निवडणुकीची प्रक्रिया सध्या चालू आहे. गावोगावी जाऊन सेवा सोसायटी संचालक व ग्रामपंचायत सदस्य यांच्या भेटी गाठी घेण्यासाठी आ. पाचपुते व नागवडे कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र नागवडे उपाध्यक्ष बाबासाहेब भोस. युवा नेते प्रतापसिंह पाचपुते हे गावोगावी भेटी गाठी घेत आहेत. आज आढळगाव. तांदळी दुमाला. भावडी आदी भागात सर्व भागात नेत्यांनी दौरा केला.

या दौर्यावेळी राजेंद्र नागवडे यांनी सोसायटी मतदारसंघ. ग्रामपंचायत मतदारसंघ. दुर्बल घटक मतदारसंघ व अनुसूचित जाती जमाती मतदारसंघ या मतदारसंघातून उमेदवार निश्चित झाल्याचे जाहीर केले. पण या निवडणुकीत निष्ठावंत आमदार पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांशी साधी चर्चा ही न करता कॉंग्रेस पक्षाचे नेते हेमंत ओगले यांच्या बंधु ची उमेदवारी नागवडे यांनी जाहीर केली. 

ज्या उमेदवाराची उमेदवारी जाहीर केली त्यांनी किमान गावात गेल्यावर मतदारांशी  संवाद साधणे गरजेचे आहे पण तसे काही दिसून आले नाही. नेमके कोण मतदार आहेत याची तरी कल्पना ओगले यांना नसली तरी त्यांच्या समर्थकांना असणे गरजेचे आहे. 

त्यामुळे या निवडणुकीत आमदार बबनराव पाचपुते यांना मानणारा एक गट नाराज दिसून येत आहे. पाचपुते यांच्या कार्यकर्त्यांनी फक्त उमेदवारी अर्ज दाखल करायचे व नेत्यांच्या आदेशानुसार माघारी घ्यायचे का? असा सवाल उपस्थित होत आहे. जर तडजोडी करायच्या तर अर्ज तरी कशाला भरायला लावायचे अशा बोलक्या प्रतिक्रिया येत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post