यात्रेतील किरकोळ कारणावरील वादावादीचे दगडफेकीत रुपांतर....

नगर  : नगर तालुक्यातील बायजाबाई जेऊर यात्रेत शेवटच्या दिवशी दोन गटात किरकोळ कारणावरून वादावादी झाली. यामध्ये दोनजण जखमी झालेले आहेत.


यात्रेत किरकोळ कारणावरून दोन गटात वादावादी झाली. त्यानंतर दोन्ही गटांनी आपली मानसे बोलवून घेतली. त्यानंतर गावात किरकोळ कारणावरून सुरु झालेला वादाचे रुपांतर तुफान दगडफेकीत झाले.  

या दगडफेकीत दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर त्यांच्यावर शासकीय रुग्णांमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणामध्ये असल्याचे समजते.  

या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.या प्रकरणतील दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post