अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे गांधीनगर (गुजरात ) येथे राष्ट्रीय अधिवेशन..... राज्यसंघटक राजेंद्र निमसे यांची माहिती....

नगर : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाचे २९वे राष्ट्रीय अधिवेशन गांधीनगर(गुजरात) येथे ११ ते १३ मे २०२३ दरम्यान संपन्न होत आहे. या अधिवेशनाचे उद्घाटन हे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. त्यांचे समवेत गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र भाई पटेल व भारताचे केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला व मनसुख भाई मांडवी हेही उपस्थित राहणार असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.


तीन दिवस चालणाऱ्या या अधिवेशनात ११ मे रोजी जनरल कौन्सिल सभा होणार असून १२मे रोजी ध्वजारोहण होऊन खुले अधिवेशनास सुरुवात  होणार आहे. 

सकाळी महिला शिक्षण परिषद व दुपारी खुल्या अधिवेशनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हस्ते होणार असून यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्रभाई पटेल ,केंद्रीय मंत्री पुरुषोत्तम रूपाला, मनसुखभाई मांडवीय आदि उपस्थित राहाणार आहेत. १३ मे रोजी भव्य शिक्षण परिषद होणार असून यात देश -विदेशातील अनेक शिक्षणतज्ज्ञ सहभागी होणार आहेत.

जुनी पेन्शन योजना लागू करणे, नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षण व शिक्षक विरोधी तरतुदी वगळणे, शिक्षणसेवक योजना रद्द करून नियमित शिक्षकांची नेमणूक करणे ,शिक्षणावरील खर्च ६% करणे व सातव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करणे वशिक्षकांकडे काढून टाकणे या प्रमुख मागण्या अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याचे अहमदनगर  संघाचे जिल्हा सरचिटणीस  सुनील शिंदे यांनी सांगितले.

या अधिवेशनास जास्तीत जास्त शिक्षकांनी सहभागी व्हावे असे आवाहन राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे ,  शिक्षक नेते सर्जेराव राऊत , उपाध्यक्ष सुनिल जाधव ,राज्य संघटक राजेंद्र  निमसे , संघाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम ,ऐक्य मंडळाचे जिल्हाध्यक्ष विष्णू बांगर , जिल्हा सरचिटणीस सुनिल शिंदे, कार्याध्यक्ष शरद वांढेकर ,सुरेश नवले,दत्तात्रय परहर ,  प्रदिप चक्रनारायण ,राजकुमार शहाणे, सुधीर रणदिवे ,सुनील दरंदले ,बापूराव वावगे , भाऊसाहेब घोरपडे ,नामदेव धायतडक ,गणेश पोटे , लाजरस कसोटे ,विष्णू चौधरी , संजय शेळके,रज्जाक सय्यद , मधुकर डहाळे , प्रकाश पटेकर ,महादेव चोभे ,जर्नादन काळे, पांडुरंग देवकर , बुथेवल हिवाळे ,सुधीर बोऱ्हाडे ,बाळासाहेब जाधव , लक्ष्मण चेमटे, संतोष ठाणगे, संदिप भालेराव ,महेश लोखंडे,उद्धव डमाळे, विलास लवांडे, नंदू गायकवाड ,पांडुरंग झरेकर ,शहाजी जरे, ज्ञानदेव कराड ,सुखदेव डेंगळे, दिलीप दहिफळे,  संजय सोनवणे,रविंद्र अनाप, प्रकाश कदम ,राजेंद्र सोनवणे ,राजेंद्र खंडागळे, शिवाजी माने, राजू भोईटे ,प्रवीण शेळके , अशोक दहिफळे  ,विनायक गोरे , आदिनाथ पोटे , आदिल शेख , संजय कांबळे , रविंद्र दरेकर , लहू फलके यांचे सह महिला आघाडी जिल्हाध्यक्ष दिपाली पुराणिक , जिल्हा सरचिटणीस संगीता घोडके , शिक्षक बँकेच्या माजी संचालिका संगीता निमसे ,मनीषा क्षेत्रे ,सुरेखा बळीद  ,उज्वला घोरपडे , संगीता निगळे , मनीषा गोसावी सविता नागरे , वर्षा शिरसाठ , शितल ससे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post