अमर छत्तीसे
श्रीगोंदा : खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या बाबत अनेक जण नाराजी व्यक्त करू लागले आहे. विखे यांच्या विरोधातील ही नाराजीची लाट वाढत चालल्यामुळे त्यांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आमदार राम शिंदे यांच्या पाठोपाठ आता आमदार बबनराव पाचपुते यांनीही विखे यांच्या विरोधात बंड पुकारले आहे. राम शिंदे यांच्या पाठोपाठ आता आमदार बबनराव पाचपुतेही उपमुख्यमंत्र्यांकडे विखे यांच्या विरोधात तक्रार करणार आहे.
नगर दक्षिणचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या विरोधात सध्या अंतर्गत विरोधक वाढू लागला आहे. हा विरोध दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. विरोध वाढत असला तरीसुजय विखे त्याकडे गांभीर्याने लक्ष देत नसल्यामुळे आणखीच त्यात भर पडत आहे.
मागील आठवड्यात माजी मंत्री राम शिंदे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्ष नेतृत्वाकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांनी पक्षाकडे तक्रार केली की नाही गुलदस्त्यात आहे. मात्रभाजपाच्या वरिष्ठ नेत्यांनी या दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाल्याचे जाहीर केलेले आहे. विखे व शिंदे यांच्यातील वाद मिटत नाही तोच पुन्हा एक वाद समोर आला आहे.
आमदार बबनराव पाचपुते यांनी ही पक्ष नेत्तृत्वाकडे लेखी स्वरूपात नाराजी व्यक्त केली असल्याची चर्चा तालुक्यातील कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली. तक्रार केली असेल तर यावर आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहेत.
खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी सध्या "हम करेसो भाजप "अशीच भुमिका घेत असल्याची चर्चा भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. जामखेड बाजार समिती मध्ये विखे यांची भुमिका राष्ट्रवादी पुरक असल्याचे माजी पालकमंत्री राम शिंदे यांनी जाहीर रित्या सांगितले. अशीच परिस्थिती श्रीगोंदा बाजार समितीमध्ये ही झाली.
विखे यांचे समर्थक हे राष्ट्रवादीच्या गटात गेले व निवडून आले. पण भाजप म्हणून खासदार विखे यांनी या निवडणुकीत लक्ष घातले नाही असे आमदार पाचपुते यांच्या गटाचा आरोप आह. तसेच खा. विखे यांच्याकडून अथवा पालकमंत्री म्हणून कोणतीही मदत होत नाही.
उलट प्रत्येक गावातील विरोधी पक्षाच्या कार्यकर्त्यांना त्यांची यंत्रणा बळ देत असल्याचे अनेकदा समोर आले. मागील काही महिन्यांपूर्वी विकासकामांसदर्भात काष्टी येथे प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत काही गावातील प्रमुखांनी खासदार विखे पाटील यांच्या कानावर या गोष्टी घातल्या होत्या. पण यात काडीमात्र बदल झालेला दिसून येत नाही.
विखे पाटील यांच्या राजकारणात त्यांची पॅरोल यंत्रणा राबत अस.ते त्यामुळे गावात दोन गट असले की एक गट आपलासा करून घेण्यात विखे पाटील पारंगत आहेत. विखे पाटील यांच्या कडे पालकमंत्री पद असताना देखील म्हणावी अशी कोणतीही मदत होत नाही, असाही आ. पाचपुते समर्थकांचा आरोप आहे
या सर्व बाबी कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांना म्हणजे आ. बबनराव पाचपुते यांना सांगितल्या. यात तथ्यता असल्याचे जाणवल्य मुळे आमदार बबनराव पाचपुते यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांची तक्रार केली असल्याचे समजते.
या तक्रारीत मागील काही महिन्यांपूर्वी खासदार यांनी श्रीगोंद्याबाबत घेतलेली भूमिकेबाबतचा खरोखर या निवेदनात मांडण्यात आलेला आहे. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले.

Post a Comment