चांदा : चांदा ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विविध विषयावर चर्चा होऊन ठराव संमत करण्यात आले. त्यात चांदा बाजार तळाचे नामकरण छत्रपती शिवाजी महाराज मैदान करण्याचा ठरावही करण्यात आला.
चांदा ग्रामपंचायत सभागृहात ग्रामसभेला सुरूवात झाली. सभेच्या अदयक्षस्थानी गावच्या सरपंच सुनंदाताई दहातोंडे होत्या. सुरुवातीला ग्रामविकास अधिकारी यांनी मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले . त्यानंतर सभेत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये गट नंबर 521 मधील अतिक्रमण काढणे, जागेचे नूतनीकरन करणे.
ग्रामपंचायत पुढील सर्व जागेस छत्रपती शिवाजी महाराज मैदान असे नाव देऊन तेथे फलक लावणे, बाजारतळ व दशकिया विधीसाठी जागेची निवड केलेली आहे. गायरान जमीन हिवरा रोड येथे सोलर सिस्टम बसवणे, रेशन धान्य दुकानदारा कडे ग्राम पंचायतचा ठराव दिलेल्या नागरिकांनी त्या-त्या रेशन धारकाकडे आपआपले कागदपत्रे नेऊन देणे, चांदा गावातील देवस्थानच्या जिर्णोध्दारासाठी विविध पर्यायांचा विचार करणे.
जलजिवन योजने अंतर्गतची कामे सर्व पुर्ण करून पिण्याचे पाणि गावठान व वाड्या वस्तावर जाणेकरीता प्रयत्न करणे. जलसंधारण योजनेअंतर्गत गावातील विविध कामे घेणे, गायरान मधील झाडे व बाजार लिलाव लवकरात लवकर करणे,
राखपसरे वस्ती मिरी रोड येथे सार्वजानिक सौचालय बांधणे, वाड्या व्स्त्यावर रोड कार्नर बस स्टँड चौक व ठिकठिकाणी सिमेंट बाक टाकणे, स्ट्रीट लाईट टाकणे, नदीचे शुशोभीकरण करणे, सरसेनापती मानकोजी दहातोंडे कमानी जवळ पेविंग ब्लॉक करणे आदी विषयांवर चर्चा होऊन विविध ठराव घेण्यात आले.
यावेळी मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजीराव दहातोंडे, उपसरपंच वर्षाताई जावळे, माजी उपसरपंच चांगदेव दहातोंडे, सदस्य अरूण बाजारे, अमित रासणे, किरण जावळे, महेश दहातोंडे, प्रा . शरद टेकाडे, सागर जावळे, कार्तिक पासलकर, प्रविण दहातोंडे, राजू शेटे, मिनिनाथ थिटे , सुभाष शेंडे, अंजाबापू मेहेत्रे, गोरख दिवटे, दादू पंडीत, रशिद सय्यद आदिंनी चर्चेत भाग घेतला. कल्पना लोखंडे यांनी आभार मानले.

Post a Comment