नगर : राज्य परिवहन महामंडळाचे पहिले वाहक लक्ष्मणराव केवटे यांचे बुधवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटाने निधन झाले. त्यांचा अंत्यविधी १८ मे २०२३ रोजी सकाळी नऊ वाजता अमरधाम अहमदनगर नालेगाव येथे होणार आहे.
केवटे यांनी सातत्याने एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्नावरमी पाठपुरावा केला. त्यांच्या पाठपुराव्यामुळे एसटी कामगारांचे काही प्रश्न सुटण्यास मदत झालेली आहे.
एसटी प्रशासनाला नेहमीच केवटे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. एसटी प्रशासनाने सुरु केलेल्या प्रत्येक योजनेच्या शुभारंभाच्या वेळी केवटे यांना निमंत्रित करून त्यांचा सन्मान केला आहे.

Post a Comment