नगर : श्रीगोंदे तालुक्यातील आढळगाव येथील स्मशानभूमीच्या जागेवर गावातील एका व्यक्तीने अतिक्रमण केले. मात्र हे अतिक्रमण समाजातील तरुणांनी उखडून टाकले.
यात महत्वाची भूमिका सरपंच शिवप्रसाद उबाळे व देखरेख संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे व माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ठवाळ यांनी महत्वाची भूमिका बजावली.
आढळगाव येथील गट क्रमांक ५१६मध्ये स्मशानभुमिची नोंद आहे. तसेच याच गटात ग्रामपंचायतीची पाणी पुरवठा टाकी आहे. पण या जागेवर गावातील एका कुटुंबाने अतिक्रमण केले होते याबाबत विशेष ग्रामसभा बोलविण्यात आली.
या सभेत संबंधित अतिक्रमण काढण्याचा निर्णय झाला पण ग्रामसभा होऊनही अतिक्रमण निघत नसल्यामुळे सरपंच उबाळे व संघाचे उपाध्यक्ष शरद जमदाडे यांनी पुढाकार घेऊन हे अतिक्रमण काढण्यास भाग पाडले. या वेळी अमोल डाळिंबे. संतोष सोनवणे. दत्ता छत्तीसे. नितीन छत्तीसे. ज्ञानेश्वर डाळिंबे. यांच्या सह तरुण उपस्थित होते.
पण अशीच भुमिका सरपंच उबाळे यांनी गावातील मंडळ अधिकारी कार्यालयाच्या जागेबाबत अशीच भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Post a Comment