मुखवटा घेऊन काम करू नका....

नगर ः आपले काम प्रामाणिकपणे करावे. कोणत्याही प्रकारचा मुखवटा घेऊन काम करू नये, असा सल्ला बलोच मराठी चित्रपटाचे सिने अभिनेते एजाज अली यांनी युवक-युवतींना दिला. 


केडगाव येथे आर.एम.टी. कंपनीच्या वतीने युवक-युवतींसाठी आयोजित करण्यात आलेल्या संवाद सेलिब्रिटीशी कार्यक्रमात एजाज अली बोलत होते. आर.एम.टी. ग्रुपचे संचालक मनीष ठुबे यांनी युवकांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. 

एजाज अली म्हणाले की, सोनं तापल्याशिवाय दागिना घडत नाही व त्याला चकाकी येत आहे. त्याच प्रकारे कष्ट करुन स्वत: चे अस्तित्व सिध्द करता येऊ शकत नाही. स्वत:च्या जीवनाचे शिल्पकार तुम्ही स्वत: असता. आपल्या जीवनाला दिशा द्या, थोड्या यशाने हूळून न जाता स्वत:चा गर्व बाळगू नका. आपले काम छंद म्हणून करावे. अभिनय हे सर्वांच्या अंगात असतो, तो फक्त जोपासता आला पाहिजे. 


आपले काम करताना शून्यातून विश्‍व निर्माण करा. त्याचबरोबर शिक्षणही महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तर आपल्या पालकांशी संवाद साधण्याचे आवाहन करुन पालकांना देखील त्यांनी मुलांमध्ये असलेल्या कलागुणांना ओळखून त्या दिशेने प्रोत्साहन देण्याचे सांगितले. 

या कार्यक्रमासाठी सिने अभिनेते संतोष वारे, उद्योजक मनिष ठुबे, संगीत विभाग प्रमुख महेश खोपीटकर, ओमप्रकाश थोरात, सुनील ठुबे, विजय निमसे, निलेश चिपाडे, काळे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post