अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यातील एका राजकीय नेत्याने युवा नेतृत्वाची बाजार समिती निवडणुकीत कशी फसवणूक केली आहे. या फसवणुकीचा लेखाजोखाच समाज माध्यमावर युवा नेत्याने मांडला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातबाजार समितीची निवडणूक झालेली आहे. ही निवडणूक आमदार बबनराव पाचपुते व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडेपत्र येत राहुल जगताप यांचे विरोधात लढवली होती. या निवडणुकीत आमदार गटाला बहुमत मिळालेत्यांचा सभापती निवडला गेला आहे.
या निवडणुकीत कार्यकर्ते फोडातोडीचे राजकारणही झालेले आहे. दोन युवा नेतृत्वाला एका गटाने गटानेजवळ घेत त्यांना संधी दिली. या दोन्ही गटांनी मताच्या राजकारणासाठी एकमेकांच्या भावनांशी खेळ केला. काहींनी तर घरात वाद लावून उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उभे केले.
मात्र या निवडणुकीत त्यांचा पराभव करण्यासाठी प्रयत्न केले. त्यात एका युवा नेतृत्वाचा पराभव झाला तर एक विजयी झालेला आहे. विजयी झालेल्या युवा नेतृत्वाला मित्राचा पराभव झालेला रुचलेला नाही. त्याचा बदला घेण्यासाठी आता या युवा नेतृत्वाने बंड पुकारला आहे.
समाज माध्यमावर बाजार समिती निवडणुकीत झालेल्या सर्व घटनांचा लेखाजोखाच त्यातून मांडून समोर आणला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. या युवा नेतृत्वाच्या या पोस्टने संबंधिताला आगामी काळात चांगलाच मस्ताप करण्याची वेळ येत आहे.
त्या युवा नेत्याने टाकलेल्या पोस्टमुळे आता संबंधितला चांगलंच आगामी निवडणुका मनस्ताप सहन करण्याची वेळ येणार आहे. आगामी काळात संबंधितांच्या अशा वागणुकीचीशिक्षा त्याला मिळणार असून फटका मात्र पक्षाला बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Post a Comment