नेवासा ः यशवंतराव गडाख यांचे नगर जिल्ह्यासह राज्याच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. त्यांचे काम दीपस्तंभाप्रमाणे आहे. ते सर्वांना प्रेरणादायी असेच आहे. गडाख यांनी नेवासा तालुक्यातील गावा-गावात निसर्ग संवर्धनाचे जे काम केले आहे. ते निश्चितच अभिमानास्पद असेच आहे, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केले.
ज्येष्ठ नेते माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या
वाढदिवसानिमित्त शुक्रवारी माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव बाळासाहेब
ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व त्यांच्या पत्नी रश्मी उद्धव
ठाकरे यांनी सोनई येथील यशवंतराव गडाख यांच्या
निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. या वेळी त्यांनी यशवंतराव गडाख यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्या वेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले की, माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या भेटीमुळे नवी ऊर्जा व लढण्यास बळ मिळाले आहे. ही ऊर्जा घेऊन मी माझा संघर्ष सुरूच ठेवणार आहे

Post a Comment