नगर : केडगाव उपनगराला पिण्याच्या पाण्याची नेहमीच टंचाई जाणवते. यचटयेनकेनप्रकारे त्रास सहन करावा लागतो. कधी जलवाहिनीचे शिफ्टींग, तर कधी मध्येच कोणीतरी केडगावच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारतोय. या सर्व प्रकरणांवर आपण नेहमी. केडगावकरांसाठी आवाज उठवला आहे.
प्रभागातील नागरिकांवर अन्याय होत असेल, तर मी स्वस्थ बसणार नाही. मी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही. केडगावच्या जनतेच्या हक्काच्या पाण्यावर गदा येऊ दिली नाही, त्यासाठी प्रशासनाशी भांडावे लागले. मध्यंतरी जलवाहिनी शिफ्टींगमुळे गढूळ पाणी येत होते.
केडगावकरांच्या आरोग्याचा प्रश्न होता. त्यावेळी देखील सर्व टाक्यांत स्वतः जातीने उभे राहून पाणी विड्रॉल केले व सर्व केडगावच्या पिण्याच्या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून घेतल्या त्यानंतरच त्वरित पाणीपुरवठा करण्यात आला.
आता सहा-सहा दिवस केडगावकरांना पिण्याच्या पाण्यासाठी तिष्टावे लागत आहे. पाणी आहे, तरी पुन्हा तीच परिस्थिती का निर्माण झाली, याबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला. तीच उडवाउडवीची उत्तरे मिळतात. वेगवेगळी कारणे देऊन परिपत्रके काढून बोळवण करण्याचा प्रयत्न सकृतदर्शनी आपल्या निदर्शनास आला.
यानंतर स्वतःच पंपिंग स्टेशनला भेट देण्याची मी ठरवले. तात्काळ नागापूर येथील ज्या ठिकाणाहून केडगावला पाणीपुरवठा होतो, त्या पंपिंग स्टेशनला भेट दिली असता या ठिकाणी मोठी पोलखोल झाली. विळद पंपिंग स्टेशनमधून 400 हॉर्सपावरच्या माध्यमातून नागापूर पंपिंग स्टेशन येथे पाणीसाठा केला जातो.
या ठिकाणी बसविण्यात आलेल्या 100च्या हॉर्सपावरच्या 3 पंपानी केडगावला पाणी येते, हे पंप केवळ काही तासांतच पाणी उपसा करतात. मुळात पंपिंग स्टेशन इथून कमी क्षमतेने या ठिकाणी पाणी जमा होत आहे. त्यामुळे आडातच नाही, तर पोहऱ्यात कुठून येणार अशी केडगावला पुरवठा नागापूर पंपिंग स्टेशनची अवस्था आहे.
खरं घोड विळद पंपिग इथचं पेंड खातं याची खातरजमा झाली. 400 हॉर्सपावर्सचे दोन पंप नागापूर पंपीग स्टेशनपर्यंत पाणी उचलत असतील, तर ही परिस्थिती उद्भवण्यास नको, पण तसे होत नाही. हे बिल प्रशासन 800 हॉर्सपावर्स चे अदा करते व उपसा अंदाजे 500 हॉर्सपावर्सने म्हणून तर केडगावकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे.
पाणीपुरवठा अधिकारी परिमल निकम व राहुल गिते यांना हे उघड्या डोळ्यांनी दिसत नाही का? हे मोठे गुपित आहे. या गोष्टी त्यांना उघड्या डोळ्यांनी दिसत नसतील व केडगावच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न त्यांना सोडवायचाच नसेल, तर आपण केडगावच्या जनतेसाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
या प्रसंगी केडगावकरांना बरोबर घेऊन कोणतीही पूर्वसूचना न देता नगर-पुणे महामार्गावर रास्ता रोको करून माठ फोडण्याचे आंदोलन केले जाईल. याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील.
Post a Comment