नगर ः ग्रामीण विकास मंडळ संचलित चक्रधर स्वामी प्राथमिक विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांनी मोठ्य संख्येने हजेरी लावली. गुलाबपुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले.
शाळेचा आज पहिलाच दिवस असल्यामुळे शाळा फुग्यांनी सजविण्यात आलेली होती. यामुळे शाळा आकर्षक दिसून येत होती. शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
या वेळी पालकांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वितरणही करण्यात आले. मुख्यध्यापिका मनीषा कासार यांनी या वेळी मार्गदर्शन केले.
आर. पी. आगलावे यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.
Post a Comment