नगर : कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगरचे मार्केड यार्डवर सालाबाद प्रमाणे संत श्री निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र त्रिंबकेश्वर वरून श्री क्षेत्र पंढरपूरकडे पायी जाणारा दिंडी सोहळा १४ व १५ जून या दोन दिवसाकरिता मुक्कामासाठी थांबणार आहे.
१६ जूनला प्रस्थान करणार आहे. सदरची दिंडी समितीचे भुसार व फळे भाजीपाला यार्डवर दोन दिवस मुक्कामी आहे. दिंडीमध्ये सुमारे ३५ हजार 3 वारकरी सहभागी आहेत.
त्या अनुषंगाने १४ ते १६ या तीन दिवसाकरिता समितीचे भुसार बाजार, कडबा बाजार व फळे भाजीपाला बाजार बंद राहणार आहे. त्यामुळे भुसार व फळे भाजीपाला उत्पादक शेतकरी बांधवांनी सदरचे बंद कालावधीमध्ये आपला शेतमाल यार्डवर विक्रीस आणू नये.
सदर दिंडी कालावधीमध्ये उपबाजार आवार नेप्ती येथे कांदा लिलाव नियमित चालू राहणार आहे,असे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भाऊसाहेब बोठे, यांनी सांगितले.यावेळेस समितीचे उपसभापती रभाजी सुळ आणि संचालक मंडळ, सचिव, सहाय्यक सचिव उपस्थित होते.
Post a Comment