नगर ः सावेडी नाका येथे सर्कस पाहण्यासाठी गेलेल्या एका अल्पवयीन मुलाला (वय १७) मारहाण करून त्याच्या खिशातील १ हजार ४६० रूपये काढून घेतल्याची घटना बुधवारी (ता.१४) रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
या प्रकरणी जखमी अल्पवयीन मुलाने तोफखाना पोलिस ठाण्यात गुरूवारी (ता.१५) दिलेल्या फिर्यादीवरून मयुर सुनील भिंगारदिवे (रा. सावेडीगाव, ) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुधवारी रात्री फिर्यादी मुलगा सावेडी नाका येथे सर्कस पाहण्यासाठी गेला होता. तो सर्कसच्या वाहनतळामध्ये असताना, त्याच्या ओळखीचा मयुर भिंगारदिवे तेथे आला. त्याने दारू पिण्यासाठी पैशाची मागणी केली.
फिर्यादी मुलाने पैसे नसल्याचे सांगितले असता, मयुर याने त्याला मारहाण करून त्याच्या खिशातील १ हजार ४६० रूपये बळजबरीने काढून घेतले. तु जर पोलिसांत तक्रार दिले तर तुला जीवे मारून टाकीन, अशी धमकी दिली.
Post a Comment