नगर : शेतामध्ये जाणार्या- येणार्या रस्त्याच्या वादातून अकोळनेर (ता. नगर) शिवारात दोन गटांत तलवार, लोखंडी रॉडने तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली. मारहाणीत दोन्ही गटांचे मिळून सात जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी परस्परविरोधी फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत.
सिताराम उर्फ बाळासाहेब नारायण गारूडकर (वय 60 रा. तळामळा, अकोळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब शेळके, नाथा देशमुख, निलेश देशमुख, यशवंत देशमुख, रोहिदास देशमुख, कुंडलिक गारूडकर, विठ्ठल गारूडकर, दादा मोठे (सर्व रा. अकोळनेर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सिताराम उर्फ बाळासाहेब यांनी दिलेल्या फिर्यादी म्हटले आहे की, ‘शनिवारी (3 जून) सकाळी माझ्या शेतात शेत तलवाचे काम सुरू असताना बाळासाहेब शेळके व इतर तेथे आले व म्हणाले, येथे रस्ता आहे, तुम्ही शेत तलाव करायचा नाही.
त्यांना समजून सांगत असताना त्यांनी लोखंडी पाईप व तलवारीने माझ्यासह मुलगा, पत्नी, आई यांना मारहाण केली.’ मारहाणीत फिर्यादी सिताराम उर्फ बाळासाहेब गारूडकर, शुभम सीताराम गारूडकर, विनायक सिताराम गारूडकर जखमी झाले आहेत.
दुसर्या गटाचे नाथा मुरलीधर देशमुख (रा. अकोळनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सिताराम नारायण गारूडकर, शुभम सिताराम गारूडकर, विनायक सिताराम गारूडकर, ज्योती सिताराम गारूडकर, शकुंतला नारायण गारूडकर (सर्व रा. अकोळनेर) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाथा देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘सिताराम गारूडकर हा शेतात जाणार्या- येणार्या रस्त्यावर शेत तलावाचे काम करत होता.

Post a Comment