राम शिंदे यांच्या वक्तव्याला विखे यांचे आव्हानच....

नगर : आता पाऊल मागे नाही तर पुढे टाकायचे आहे, असे सांगत खासदार डॉ. सुजय विखे यांनी आमदार राम शिंदे यांच्या वक्तव्याला एक प्रकारे आव्हानच दिले. 


शासकीय विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष मिलिंद गंधे, जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, दिलीप भालसिंग उपस्थित होते.

राम शिंदे यांनी मी एक पाऊल मागे घ्यायला तयार आहे तुम्ही सुद्धा घ्या, असं आवाहन केलं होतं. त्यासंदर्भात विचारल्यावर खासदार विखे यांनी आता पाऊल मागे नाही तर आता पाऊस पुढे टाकायचे आहे असं म्हणत त्यांनी शिंदे यांच्या विषयाची एक प्रकारे खिल्ली उडवली आणि थेट बोलण्याचे टाळले. आम्हाला पुढे पाऊल टाकायचे असे म्हणत त्यांनी एक प्रकारे शिंदे यांना टोला लगावला.

खासदार विखे म्हणाले की, मी उमेदवार असेल-नसेल हे काही मला माहीत नाही. मात्र, पक्ष ज्याला उमेदवारी देईल व देवेंद्र फडणवीस ज्यांना उमेदवारी देतील त्यांच्यासाठी सर्वजण प्रचार करतील, असं उत्तर दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post