नगर : जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अशुद्ध लेखनावरून सदस्यांनी अनेकदा सामान्य प्रशासन विभागाला धारेवर धरले आहे. यावेळी प्रशासनाने चुका होणार नाही, असे अनेकदा जाहीर केलेले आहे. चुकांचा परिपाठ अद्यापही सुरू आहे. नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेत चुका होत्या. त्यावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेच्या अधिकारी व कर्मचारी यांच्याकडून नेहमी शुद्धलेखनाच्या चुका होत असतात. या चुकांमुळे जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभांमध्ये अनेकदा सदस्यांसह पदाधिकाऱ्यांना सामान्य प्रशासनाला धारेवर धरलेले आहे.
प्रत्येक वेळी माफी मागितली जात होती. पुढील काळात चुका होणार नाही असे सभागृहात स्पष्ट केले जात होते. मात्र सुरूच आहे. या चुकांमुळे जिल्हा परिषदेची प्रतिमा मलीन होत आहे. असे असतानाही अधिकारी व कर्मचारी या चुकांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्हा परिषदेने एका कार्यक्रमाचे भव्यदिव्य आयोजन केले होते. हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.या कार्यक्रमासाठी प्रशासनाने निमंत्रण पत्रिका तयार केली होती. या निमंत्रण पत्रिकेत100 शब्दात पाच शुद्ध शुध्दलेखनाच्या चुका दिसून आल्या. साधे साधे शब्द अशुद्ध पद्धतीने लिहिण्यात आलेले होते. शब्द पाहून अनेकांनी नाराजी व्यक्त केलेली आहे.
अशुद्ध लेखनाचा परिपाठ जिल्हा परिषदेतील सर्वच विभागात सुरू आहे. विशेष म्हणजे शिक्षण विभागातील अनेक फाईलही अशुद्ध लेखनाने लिहिलेले असतात. याबाबत अनेकदा तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनीही नाराजी व्यक्त करून कर्मचाऱ्यांची झाडाझडी घेतलेली आहे.

Post a Comment