शेतीच्या वादातून हाणामारी....

नगर : वडिलोपार्जित शेतजमिनीच्या वाटपावरून सख्या भावात वाद होऊन एकाने दुसर्‍याला लाकडी दांडक्याने मारहाण केल्याची घटना रविवारी (ता.११) दुपारी केडगाव उपनगरात घडली. या प्रकरणी जखमी नवनाथ पोपट राहिंज (वय ४२ रा. राहिंजमळा, भूषणनगर, केडगाव) यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.


या फिर्यादीवरून त्यांचा भाऊ दत्ता पोपट राहिंज (रा. म्हसोबा चौक, नेप्ती रोड) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवनाथ व दत्ता हे दोघे सख्खे भाऊ आहेत. त्यांच्यामध्ये वडिलोपार्जित शेत जमिन वाटपावरून वादविवाद होत असतात. सदरची शेत जमिन ही त्यांचे मयत वडिल पोपट मनाजी राहिंज यांच्या नावावर आहे.

रविवारी दुपारी साडे तीन वाजता नवनाथ यांच्याकडे दत्ता आला तेव्हा ते त्याला म्हणाले, आपण आपल्या वडिलोपार्जित जागेचे व शेतीचे विभाजण करून खाते फोड करून घेऊ, असे म्हणताच दत्ताला राग आल्याने त्याने नवनाथ यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस अधिक तपास करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post