नगर : जिल्ह्यात राष्ट्रवादीमध्ये आलबेल सुरू असताना अचानक गडबड सुरू झालेली आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांच्या घरावर राष्ट्रवादीच्याच कार्यकर्त्यांनी गद्दार लिहिलेले खडबड उडली आहे. त्यानंतर. फाळके हे राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा जिल्हाभर झाली.
त्यातच ज्येष्ठ नेते घनश्याम शेलार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली. जिल्ह्यात अचानक राष्ट्रवादीमध्ये होऊ लागले हा चर्चेचा विषय होत आहे. यासर्व घडामोडींची सखोल चौकशी व्हावी अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे
म्हातारी मेल्याचे दुख नाही पण काळ सोकावला नाही पाहिजे या म्हणीप्रमाणे राष्ट्रवादी सुरू असलेल्या घडामोडींचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. त्यातूनच पक्षामध्ये असे काम कोणाला करायची आहे हे स्पष्ट होईल. पक्ष खिळखिळा होण्याऐवजी मजबूत राहिल. दिले सुरू असलेला हा सर्व प्रकार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार त्यांच्या कानावर घालणे गरजेचे आहे.
कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती उपसभापती निवडी संदर्भात राष्ट्रवादीचे मत फुटल्याने सभापती व उपसभापती राम शिंदे गटाचे निवडून आल्याने तो राग मनात धरून रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत कर्जत येथील राजेंद्र फाळके यांच्या घराच्या भिंतीवर गद्दार लिहीत घोषणा देत तीव्र निषेध व्यक्त केला. संबंधितांवर पक्षांतर्गत कारवाई करावी अशी मागणी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमधून होत आहे.
राजेंद्र फाळके यांच्या घरावर गद्दार लिहिल्यानंतर आज त्यांच्या बाबत नवीनच अफवा पसरवण्यात आली. ते राष्ट्रवादी सोडणार असल्याची चर्चा जिल्हाभरात सुरू झालेली आहे. ते लवकरच एका पक्षात प्रवेश करणार असेमजकूर असलेले संदेश समाज माध्यमावर व्हायरल झाले.
हे आपण नेमकी कोणी व कशासाठी पसरवली याचा तपास होणे गरजेचे आहे. या प्रश्न आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावे अशी मागणी जिल्हाभरातून होत आहे.
राजेंद्र फाळके हे राष्ट्रवादी सोडणार असल्याचे जिल्हाभरात चर्चा झाली. अनेकांनी फाळके यांच्याशी दूरध्वनीहून संपर्क साधून माहिती घेतली. त्यानंतर फाळके यांनी समाज माध्यमावर संदेश टाकून आपण राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले.
फाळके यांनी राष्ट्रवादी सोडणार नसल्याचे स्पष्ट केले. फाळके यांच्या बाबत ही अफवा कोणी पसरवली? कोणाच्या सांगण्यावरून पसरवली? त्यामागे कोण आहे? हे स्पष्ट होणे गरजेचे आहे. आज फाळकेंबाबत अफवा उठवली उद्या कोणाही बाबत अशीच अफवा पसरवली जाऊ शकते. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. फाळके यांनी हा टाकला समाज माध्यमावर संदेश व्हायरल केला आहे.
अजित पवार यांचे विश्वासू राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी हैदराबाद येथील मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या निवासस्थानी भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षात प्रवेश केला आहे. घनश्याम शेलार यांनीही पक्षातील कुरघोड्याला राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिली आहे.
त्यांच्या प्रवेशामुळे श्रीगोंद्यात राष्ट्रवादी गटाला मोठा धक्का बसला आहे. पक्ष सोडणारे हे सर्वांना माहीत होतेतरीही त्यांना थांबवण्याचा प्रयत्न कोणी केला नाही. यावरून जिल्ह्यातीलकाही नेत्यांना पक्ष खिळखिळा व्हावा असेच वाटत असल्याची चर्चा राष्ट्रवादीचे गोटात सुरू आहे.
Post a Comment