नगर : जिल्हा रुग्णालयात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. या वर्गाचा समारोप जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या उपस्थित करण्यात आला.
एक ते २१ जून दरम्यान जिल्हा रुग्णालयात योग प्रशिक्षण वर्ग आयोजित केले होते. या वर्गाच्या समारोप प्रसंगी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. साहेबराव डावरे , वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज घुगे, डॉ. आशिष कराळे, डॉ. प्रशांत तुवर, डॉ. योगेश सोनवणे, डॉ. दीपक केळगंद्रे , अधिसेविका सुरेखा आंधळे, परिचारिका महाविद्यालयाचे प्राचार्य खटके, संजय ठोंबरे आदी उपस्थित होते.
यावेळी योगासन संबंधी पत्रकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. योग वर्गाचे संचालन जिल्हा रुग्णालयाच्या योगतज्ञ मोहिनी जाधव यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैद्यकीय अधिकारी डॉ. शौनक मिरीकर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा आयुष अधिकारी डॉ. दादासाहेब साळुंके, आयुष वैद्यकीय अधिकारी डॉ. इर्शाद मोमीन, डॉ. जयश्री म्हस्के, डॉ. नाझीया शेख. डॉ. शोभा धुमाळ, औषध निर्माता माधुरी ठोंबरे, संगीता नन्नवरे, संतोष आरु आदींनी परिश्रम घेतले.

Post a Comment