बिघडलेल्या कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी स्वीकारून राधाकृष्ण विखे यांनी राजीनामा द्यावा.....

नगर : एक वर्षापासून दंगली, खून, दरोडे व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यास पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील अपयशी या सर्व घटनांची जबाबदारी घेऊन पालकमंत्री राधाकृष्ण विखेपाटील यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी केली आहे. 


याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,  नगर शहरात जिल्हयात अनेक दिवसांपासून दंगली घडत आहेत. अनेक ठिकाणीं मारहाणीच्या घटना घडत आहेत. दरोडे, खून अशा अनेक प्रकारांनी वर्ष भरापासून जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

अशा घटना घडत असल्यामुळे नगर शहर जिल्ह्यात तणावाचे अशांत वातावरण आहे. जिह्यातील नागरिक त्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कधी काय घडेल याचा भरोसा राहिलेला नाही. लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत ते मुली महिला या सर्वच भीतीच्या वातावरण जगत आहेत. 

हे सर्व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील पालकमंत्री झाल्यापासून घडत आहे. भारतीय जनता पक्षाच्या हातात सत्ता आल्यापासून धार्मिक दंगली घडण्याचे प्रमाण वाढले. त्यातून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे सर्व घडत असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी साधा कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून आले नाही. तसेच गुन्हेगारी कमी करण्यासाठी प्रयत्न होताना सुध्दा दिसून येत नाही. 

त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम करण्यास कार्यक्षम नसल्याचे दिसून येते. जिह्यातील झालेल्या सर्व घटनांची जबाबदारी घेऊन पालकमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी मनसेचे नितीन भुतारे यांनी केली आहे. 

त्यांच्या या मागणी मुळे जिल्ह्यात व शहरात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याविरोधात नाराजीचा सूर उमटला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post