नगर : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी झालेल्या लिलावात प्रथम प्रतवारीच्या कांद्यास १२०० ते १६०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दरम्यान,
लिलावासाठी ४६ हजार ५५४ गोण्या (२५ हजार ६०४ क्विंटल) कांद्याची आवक झाली. यात प्रथम प्रतवारीच्या कांद्यास १२०० ते १६००, द्वितीय प्रतवारीस ८०० ते १२००, तृतीय प्रतवारीस ४०० ते ८००, चतुर्थ प्रतवारीस १५० ते ४०० रुपये भाव मिळाला.
गेल्या महिनाभरापासून साधारण एवढीच आवक होत आहे. दरम्यान महिनाभरात कांद्याचे भाव ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल वाढले आहेत.

Post a Comment