पारनेरचे नगराध्यक्ष औटी देणार राजीनामा....

पारनेर :   माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला पारनेर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची संधी आमदार नीलेश लंके यांनी दिली आहे. ठरल्याप्रमाणे सव्वा वर्षाचा काळ पूर्ण होत असल्याने मी माझ्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा २२ जूनला देणार असल्याची माहिती नगराध्यक्ष विजय औटी यांनी पत्रकार परिषदेत दिली. 


यावेळी माजी नगरसेवक नंदकुमार औटी यांच्यासह युवक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. औटी म्हणाले की, दुसरीकडे या कार्यकाळात माझ्यावर अनेक खोटे गुन्हे दाखल झाले आहेत. तरीपण माझ्या परीने आमदार लंके यांच्या मार्गदर्शनाखाली पारनेरच्या पाणी प्रश्नासह इतर सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी विशेष प्रयत्न केले आहे, असे ते म्हणाले.

दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी सभापती डॉ. विद्या बाळासाहेब कावरे व नगरसेवक नितीन अडसूळ यांच्यामध्ये चुरस असून या संबंधीचा निर्णय आमदार लंके घेणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post