नगर : शिक्षकांच्या बदल्यानंतर आता पात्र शिक्षकांना पदोन्नतीने मुख्याध्यापक, तसेच विस्तार अधिकारीपदी संधी देण्यात आली आहे. १९५ शिक्षकांना मुख्याध्यापकपदी, तर ३६ शिक्षकांना विस्तार अधिकारीपदी पदोन्नती देण्यात आली.
मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके, शिक्षणाधिकारी भास्कर पाटील यांच्या उपस्थितीत तालुकास्तरावरून थेट ॲानलाईन पद्धतीने शिक्षकांचे समुपदेशन करून सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देण्यात आली.
जिल्ह्यात १२ शिक्षकांना विस्तार अधिकारी श्रेणी २ व २४ शिक्षकांना विस्तार अधिकारी श्रेणी ३ या पदावर पदोन्नती देण्यात आली. ज्या शिक्षक, मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक व केंद्रप्रमुख यांच्याकडे पदवी व बीएड अर्हता आहे, तसेच बी. एड. अर्हतेत ५० टक्क्यापेक्षा जास्त गुण आहेत. अशांना विस्तार अधिकारी पदावर पदोन्नती मिळते.
याशिवाय जिल्ह्यात अनेक मुख्याध्यापकांची पदे रिक्त होती. ती सर्व पदे भरण्यात आली. यात १८९ शिक्षकांना मराठी माध्यमात मुख्याध्यापकपदी, तर ६ शिक्षकांना उर्दू माध्यमात मुख्याध्यापकपदी पदोन्नती देण्यात आली.
Post a Comment