जवाहर विदयालयात नवागतांचे उस्फूर्त स्वागत... दहावी बारावीच्या यशस्वी विद्यार्थ्याचाही सन्मान...


चांदा :  येथील जवाहर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित राहणाऱ्या नवागतांचे स्वागत गुलाब पुष्प खाऊचे पुढे गोड गोड खाद्यपदार्थ देऊन उस्फुर्तपणे  करण्यात आले. त्याचबरोबर इयत्ता दहावी व बारावी मध्ये यशस्वी विद्यार्थ्यांचाही सन्मान करण्यात आला.


आज 15 जून शाळेचा पहिला दिवस असल्याने जवाहर विद्यालयात दाखल होणारे इयत्ता पाचवी, आठवी ,आदी विद्यालयातील इयत्तामधील  नवीन येणाऱ्या विद्यार्थ्यांचे जोरदार स्वागत विद्यालय व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले. 


आज झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी चांदा ग्रामपंचायतीच्या सरपंच सुनंदाताई दहातोंडे होत्या. यावेळी प्रथमतः इयत्ता पाचवीतील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तक, गुलाबपुष्प बिस्कीटपुडे व दुपारच्या मध्यान भोजनासाठी गोड गोड जेवण देण्यात आले.


इयत्ता दहावी व बारावीतील प्रथम ,द्वितीय व तृतीय येणाऱ्या विद्यार्थ्यांचाही यावेळी ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला. 


त्यामध्ये इयत्ता दहावीतील अनुक्रमे श्रावणी बाबासाहेब दहातोंडे, शरद नानासाहेब ढवळे, आकांक्षा कोंडीराम शिंदे, ओंकार प्रकाश धुमाळ ,तसेच इयत्ता बारावीतील कला शाखेतील प्रियंका अशोक चव्हाण, पूजा भिमराज ठाकरे, आरती गणपत पुंड तसेच विज्ञान शाखेतील श्रेया सुभाष भालके, शैलेश दत्तात्रेय भाकड, पल्लवी नारायण मरकड या विद्यार्थ्यांचा चांदा ग्रामस्थ व विद्यालयाच्या वतीने सन्मान करण्यात आला.


यावेळी सरपंच सुनंदाताई दहातोंडे ,विद्यालयाचे प्राचार्य हरिभाऊ जावळे यांनी नूतन विद्यार्थ्यांचे स्वागत करत पुढील शैक्षणिक वर्षाची माहिती आपल्या मनोगतातून दिली. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे उपप्राचार्य रघुनाथ भोजने गावच्या उपसरपंच वर्षाताई जावळे , पर्यवेक्षक श्रीकातोरे दीपक जावळे ,किरण जावळे, देविदास पासलकर, बाबासाहेब दहातोंडे, नारायण मरकड विद्यालयाचे शिक्षक अनंता शेळके, संजय दगडखैर ,श्री शेटे ,श्री कारले, श्री घोडे ,श्री शेख, श्रीमती रुक्मिणी सोनवणे आदीसह शिक्षक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राध्यापक संजय ढेरे यांनी केले तर सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका स्वाती दळवी यांनी तर आभार स्काऊट मास्टर बाळासाहेब भोसले यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post