मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी अखेर भाकरी फिरवली आहे. आता राष्ट्रवादीची मोठी जबाबदारी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यावर टाकण्यात आली आहे. या दोघांना कार्याध्यक्ष करण्यात आले आहे.
खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर महाराष्ट्र व पंजाब हरियाणाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. राष्ट्रवादीचा आज 25 वा वर्धापन दिन आहे. दिल्लीत पवारांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
मुंबईतील कार्यालयात वर्धापनदिन साजरा करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे नेते दिल्लीत उपस्थित आहेत. अजित पवार, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.
आजचा वर्धापन दिन चर्चेत आहे, तो नव्या बदलामुळे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीत नवे बदल केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नवे बदल करण्यात आले आहे. यावेळी शरद पवारांनी पक्षाच्या कार्यकारी अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल व सुप्रिया सुळे यांच्या नावाची घोषणा केली. मात्र विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे कोणतीही जबाबदारी देण्यात आलेली नाही.
शरद पवार यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष पद सोडण्याची घोषणा केली होती. त्यानंतर त्यांची जागा कोण घेणार यावरुन चर्चा रंगली होती. कार्यकर्ते, नेत्यांच्या राजीनामा परत घ्या, याच्या दबावामुळे पवार यांनी आपला निर्णय बदलला होता. परंतु, आज त्यांनी पक्षाच्या 25 व्या वर्धापन दिनात मोठा धक्का दिला. त्यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्यांचीच घोषणा केली आहे.
प्रफुल पटेल यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वर्किंग प्रेसिडेंट असल्याची घोषणा केली. याचबरोबर त्यांच्यावर मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड, गोवा या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. यानंतर मुलगी सुप्रिया सुळे यांना देखील कार्यकारी अध्यक्ष केले आहे. त्यांच्यावर महाराष्ट्र, हरियाणा, पंजाब या राज्यांची जबाबदारी दिली आहे.
सुप्रिया सुळे यांच्यावर महिला युवक, युवती आणि लोकसभेचीही जबाबदारी असणार आहे. तर सुनील तटकरे यांना राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून नियुक्त केले आहे. जितेंद्र आव्हाड बिहार, छत्तीसगड, कर्नाटक अशी जबाबदारी देण्यात आली आहे.

Post a Comment