वाढदिवस साजरा करताना समाजातील गुणवंतांचा सत्कार करणे ही एक सेवाभावी संकल्पना......

निघोज : नेतेमंडळीचा वाढदिवस साजरा करताना कार्यकर्ते गुणवंतांचा सत्कार करतात. ही एक चांगली संकल्पना असून अशाप्रकारे शैक्षणिक संस्कृतीला चालना देण्याचे काम आपले गाव गणपती समाजसेवी प्रतिष्ठान, अल्पसंख्याक समाज मंडळ, व्यापारी असोसिएशन निघोज व पारनेर तालुका पत्रकार संघ करीत आहे. 


दरवर्षी सचिन पाटील वराळ यांच्या वाढदिवसानिमित्त गुणवंत विद्यार्थी, आदर्श ग्रामस्थ यांचा सत्कार करण्याचा विविध सामाजिक संस्थांचा उपक्रम सेवाभाव रुजविण्यासाठी महत्वपूर्ण असल्याचे प्रतिपादन मुलिका देवी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोहर एरंडे यांनी व्यक्त केले आहे. 

निघोज ग्रुप ग्रामपंचायत व निघोज - आळकुटी जिल्हा परिषद गटाचे सर्वेसर्वा संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यांचा वाढदिवस शुक्रवार दि. ९ रोजी निघोज येथील शरदचंद्रजी पवार साहेब अभ्यासगृहातील सभागृहात आपले गाव गणपती समाजसेवी प्रतिष्ठान,पारनेर तालुका पत्रकार संघ, निघोज व्यापारी असोसिएशन अल्पसंख्याक समाज मंडळ व विविध सामाजिक संस्थांच्या वतीने गुणवंत विद्यार्थी, पालक शिक्षक, सेवानिवृत्त प्राचार्य, प्राचार्य तसेच समाजातील आदर्श व्यक्ती अशा ७५ व्यक्तींचा सत्कार यावेळी करण्यात आला.


यावेळी संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ, हिंदवी शिक्षण संस्थेचे संस्थापक सचिव शिवाजीराव वराळ,  शिवबा संघटनेचे अध्यक्ष व युवा सेनेचे तालुकाप्रमुख अनिल शेटे, शिवबा संघटनेचे मार्गदर्शक राजूभाऊ लाळगे, सरपंच चित्राताई वराळ पाटील, उपसरपंच माऊली वरखडे, मुंबई बॅंकेचे अधिकारी सुनील पवार, वडनेरचे माजी सरपंच शिवा पवार, मंळगंगा ग्रामीण विकास ट्रस्टचे विश्वस्त भास्करराव वराळ पाटील, गजानन ठुबे, जय बजरंग मंडळाचे मार्गदर्शक भिमराव लामखडे, युवा नेते रवी लंके, रावसाहेब वराळ, किसनराव वरखडे, सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, तालुका पत्रकार संघाचे सहसचिव भास्करराव कवाद, पत्रकार सुरेश खोसे पाटील, शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संभाजी खोसे, शिक्षक सहकारी बँकेचे संचालक कारभारी बाबर, प्राध्यापक आनंद पाटेकर, प्राध्यापक विशाल रोकडे, प्राध्यापक संदीप लंके, प्राध्यापक जाधव , प्राध्यापक काकडे, ठेकेदार बाबाजी लंके, विजय बारहाते, भाजपचे ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष मनोहर राउत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष मोहन खराडे, भाजपचे जिल्हा सांस्कृतिक विभागाचे उपाध्यक्ष विलासराव हारदे, मेजर विकास वराळ, अल्पसंख्याक समाजाचे नेते अस्लमभाई इनामदार, ग्रामपंचायत माजी सदस्या शैला खराडे, मंळगंगा महिला बचत गटाच्या अध्यक्षा सविता गायखे, निलेश घोडे, राहुल वराळ, विठ्ठलराव लंके, श्रीमती लाळगे, श्रीमती बेलोटे, श्रीमती गांधी, वराळ भावकीचे कारभारी मनोहर वराळ,आपला गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवी रणशिंग, सचिव रोहित पठारे, कार्याध्यक्ष महेश ठाणगे, उपाध्यक्ष यश लोढा, पदाधिकारी भावेश इंगळे, तन्मय देशपांडे अथर्व इंगळे,नमन लोढा , शुभम शेवाळे, सचिन शिरवले, मार्गदर्शक भास्करराव सोनवणे आदी तसेच पारनेर तालुका पत्रकार संघाचे पदाधिकारी व सदस्य, आपला गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व सदस्य, अल्पसंख्याक समाजाचे सर्व पदाधिकारी व सदस्य, व्यापारी असोसिएशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे सर्व पदाधिकारी व सदस्य तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

सत्काराला उत्तर देताना संदीप पाटील वराळ जनसेवा फौंडेशनचे तालुका अध्यक्ष सचिन पाटील वराळ यावेळी म्हणाले गेली सहा वर्षात राजकारणापेक्षा समाजकारणाला प्राधान्य दिल्याने आपला लोकसंपर्क वाढला आहे. गाव व परिसरातील सामाजिक संस्थांच्या माध्यमातून आपण सेवाभावी कामे केली म्हणून याचा आदर राखीत आज समाजसेवी संघटना माध्यमातून वाढदिवस साजरा होत असताना समाजासाठी धार्मिक, शैक्षणिक, सामाजिक योगदान देणाऱ्या व्यक्तींचा सत्कार होत आहे. 

हे मी माझे भाग्य समजतो. वाढदिवस साजरा करताना सामाजिक बाबींना प्राधान्य दिले पाहिजे ही आमचे आजोबा सहकारमहर्षी किसनराव वराळ पाटील, वडील मच्छिंद्र पाटील वराळ,बंधू संदीप पाटील वराळ यांची तसेच वराळ कुटुंब व भावकी यांची आपल्याला शिकवण आहे. समाजकारण काम करताना सर्वसामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे ही आपली सामाजिक जबाबदारी आहे. यापुढेही अशाच पद्धतीने सेवाभाव करण्याचा संकल्प वराळ पाटील यांनी व्यक्त केला आहे. 

मुंबई बॅंकेचे अधिकारी सुनील पवार यांनी शैक्षणिक संस्कृती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन करताना सामाजिक संघटनांनी सचिन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त समाजातील गुणवंतांचा सत्कार केला हे काम गौरवास्पद असल्याचे सांगितले. सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर यांनी या सामाजिक कार्याचे कौतुक करीत सचिन पाटील वराळ यांनी गरिबांची दिवाळी व कोरोना काळात केलेल्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक केले. 

शिवव्याख्याते प्रा ज्ञानेश्वर कवाद यांनी आपला गणपती समाजसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष रवि रणसिंग व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचे कौतुक करीत सचिन पाटील वराळ यांचा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा करीत सामाजिक संघटनांनी आदर्श घालून दिल्याचे सांगितले. शिवबा संघटनेचे अध्यक्ष अनिल शेटे यांनी या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करीत वाढदिवस साजरा करताना सामाजिक संकल्पना राबवून या सामाजिक संघटनांचा आदर्श घेण्याचे आवाहन करीत पारनेर तालुका पत्रकार संघाचे कौतुक केले. 

प्राध्यापक आनंद पाटेकर यांनी आदर्श सामाजिक संकल्पना विकासाभिमुख कामांना पाठबळ देते हेच आजच्या कार्यक्रमात दिसून आल्याचे सांगितले. शिक्षक सहकारी बँकेचे संचालक कारभारी बाबर यांनी सचिन पाटील वराळ व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक करीत विकासाभिमुख नेतृत्व कसे असते हेच सचिन भाऊ यांनी दाखवून दिले असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन यश लोढा यांनी केले. शेवटी पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे, सहसचिव भास्करराव कवाद यांनी आभार मानले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post