कर्जत : कर्जत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे किती मते फुटली. याबाबत संपूर्ण तालुक्यात चर्चाला उधाण आले आहे.
अध्यक्ष पदाच्या निवडीत मत बाद करणार्यानेच उपाध्यक्ष पदाच्या निवडीत विरोधात मत दिले की, उपाध्यक्ष पदाच्या निवडीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुसरा संचालक फुटला हे मात्र गुलदस्त्यात आहे.
सध्या तालुक्यात वेगवेगळ्या संचालकाची नावे चर्चेत येत आहे. नेमका कोणता संचालक भाजपाला जाऊन मिळला हा संशोधनाचा विषय बनला आहे. मग कर्जत बाजार समितीच्या निवडणुकीत मात्र आमदारत्यांना चांगला धक्का बसला आहे.
आगामी निवडणुकांमध्ये पवार यांना आता सावध पावले टाकावी लागणार आहे. राष्ट्रवादीच्याअनेक नेत्यांमध्ये नाराजी असलेल्याचे स्पष्ट होत आहे. रोहित पवार यांना आतापुन्हा तळागाळातील जनतेशी संवाद साधावा लागणार आहे. अन्यथा आगामी निवडणूक मोठा संघर्ष करावा लागेल.
रोहित पवार यांना आता विश्वास टाकताना जपूनच पाऊले उचलावे लागणार आहेत. जवळचीच काहीचजण घात करीत असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झाली आहे.


Post a Comment