नगर : नगर पंचायत समितीमध्ये प्रशासक राज सुरु आहे. या प्रशासक राजमध्ये कर्मचारी मनमानी पध्दतीने कारभार करीत आहेत. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बाहेरून येणाऱ्या नाहीही शिस्त नसल्याचे दिसून येत आहे. तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थ खाऊन कार्यालयाच्या परिसरात पिचकार्या मारत आहेत.
एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियानाचा माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवून मोठया प्रमाणावर खर्च करत आहे. या योजनेची प्रसिद्धी करत आहे. परंतु नगर पंचायत समिती मधील काही कर्मचारी मावा व गायछाप कार्यालयीन वेळेत खातात.
काहीजण दरवाजातूनच थुंकत असतात. त्यामुळे कार्यालयाच्या बाहेरील पोर्चमध्ये नेहमीच थुंकलेले दिसून येते. यावरून कर्मचार्यांमध्ये नेहमीच वादावादी झालेली आहे.
स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या नगर पंचायत समितीमधील कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. सर्वांना स्वच्छतेचे धडे देण्याची नितांत गरज आहे. तसेच या कार्यालयात व्यसनमुक्ती मोहीम राबवणे हे गरजेचे आहे.
पंचायत समितीमध्ये प्रशासक राज असल्यामुळे पदाधिकाऱ्यांची येणे जाणे कमी झालेली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये बेशिस्तीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्या वातावरणामुळेतर मनमानी पद्धतीने वागत आहे. खिडक्यांमधूनचपिचकारी मारल्या जात आहे. अनेक खिडक्याहे पिचकारी मुळे रंगलेल्या आहेत.

Post a Comment