प्रशासन झोपल्यामुळे तंबाखू, गुटखा खावून थुंका कोठेही... नेवासा नगर पंचायतीचा कारभार...

नेवासा : नेवासा नगरपंचायतीमध्ये प्रशासक राज असल्यामुळे मनमानी कारभार सुरू आहे. कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बाहेरून येणाऱ्या नाहीही शिस्त नसल्याचे दिसून येत आहे. तंबाखू व इतर तंबाखूजन्य पदार्थ खाऊन कार्यालयाच्या परिसरात पिचकार्या मारत आहेत.


एकीकडे शासन स्वच्छ भारत अभियानाचा माध्यमातून स्वच्छता मोहीम राबवून मोठया प्रमाणावर खर्च करत आहे. या योजनेची प्रसिद्धी करत आहे. परंतु नेवासा नगर पंचायत मधील काही कर्मचारी मावा व गायछाप कार्यालयीन वेळेत खातात. 


काहीजण दरवाजातूनच थुंकत असतात. त्यामुळे कार्यालयाच्या बाहेरील पोर्चमध्ये नेहमीच थुंकलेले दिसून येते. काहीजण वरच्या मजल्यावर खाली असलेल्या पत्र्यांवर थुंकत आहेत. या थुंकण्याच्या प्रकाराहून अनेकदा पाचचारी व नगरपंचायतीचे कर्मचारी यांच्यात वादावादी झालेली आहे. तरीही काहीजण मावा व तंबाखू खाऊन थुंकत आहेत.


स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या नगरपंचायत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना स्वच्छतेचा विसर पडलेला आहे. सर्वांना स्वच्छतेचे धडे देण्याची नितांत गरज आहे. तसेच या कार्यालयात व्यसनमुक्ती मोहीम राबवणे हे गरजेचे आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post