रयत क्रांती संघटनेच्या पदाधिकारी यांचा सन्मान...

श्रीगोंदा : पुण्यश्लोक आहिल्यादेवी पुरस्कार 2023 24 महिला बालविकास महाराष्ट्र शासन सामाजिक क्षेत्रात केलेल्या योगदानाबद्दल महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन आपल्या ग्रामपंचायत स्तरीय पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या सन्माननीय केले.  


रयत क्रांती संघटना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष प्रतिभा संजय उंडे व नयनतारा शिंदे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. बचत गटांतर्गत गावातील 90 टक्के महिला सक्षम बनवले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास उंचावला. या कार्यामुळे ग्राम संघामार्फत त्यांना आवश्यक तेवढ्या रकमेचे कर्ज देऊन त्यातून त्यांनी त्यांच्या मुलांना उच्च शिक्षणासाठी पाठवले.

तसेच महिला बचत गटामार्फत वेगळे उपक्रम राबविण्यात आले. महिला दिन हळदीकुंकू कार्यक्रम महिला जनजागृती यातून महिलांच्या आरोग्याविषयी शिक्षणाविषयी व व्यवसाय विषयी माहिती देण्यात आली. तसेच सर्व सर्व सामान्यांची कामे यातून मार्गी लागली हा पुरस्कार विस्तार अधिकारी हराळ व ग्रामसेवक लामकाने मॅडम यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. 

यावेळी रयत क्रांती संघटना अहमदनगर जिल्हा अध्यक्ष भाऊ मांडे , अनिकेत मांडे तसेच  गावातील माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला बचत गटाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, सचिव गावातील महिला भगिनी ग्रामस्थ  ग्रामपंचायत कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

या बचत गटांच्या कामासाठी माझ्या सहकारी सुनिता उंडे तसेच माझे पती संजय उंडे यांचे ही खूप मोठे योगदान व सहकार्य आहे. माझ्या सासर्‍यांच्या (आबांच्या)पावलावर पाऊल ठेवून मी सामाजिक कार्य करत राहील. महिलांच्या हक्कासाठी हितासाठी कायम पुढे राहील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post