कर्जत : तोरकडवाडी (ता.कर्जत) ग्रामपंचायत सभागृहात अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार वितरण उत्साहात पार पडले. या वेळी तोरकडवाडीत शांताबाई तोरकड व रेश्मा तोरकड यांना सन्मानित करण्यात आले.
तोरकडवाडीत १९९१ पासून अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत असणाऱ्या शांताबाई तोरकड व बचत गटाच्या अध्यक्ष रेश्मा तोरकड यांना उपसरपंच सुरेखा धुमाळ यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर महिला सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी निलेश धुमाळ, रोहिदास तोरकड, नवनाथ धुमाळ, सुरेश धुमाळ आदी उपस्थित होते. सुरेखा धुमाळ यांनी आभार मानले.

Post a Comment