निघोज : गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करीत आजच्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचे काम जनतेतून होण्याची गरज असल्याचे प्रतिपादन शिरुर तालुक्याचे माजी आमदार व बापूसाहेब गावडे शिक्षण संस्थेचे संस्थापक पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई येथील व्यवसायीक गोरक्षणाथ ईरोळे तसेच नवी मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षा संगीता ईरोळे यांची कन्या साक्षी व कवठे येमाई येथील करण राजेंद्र पवळे यांना नीट परिक्षेत सर्वोत्तम गुण मिळाल्याबद्दल त्यांचा गावडे यांच्या हस्ते बापूसाहेब गावडे विद्यालयाच्या वतीने तसेच ईरोळे मित्रपरिवार वतीने सत्कार करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
बापूसाहेब गावडे महाविद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. या वेळी जिल्हा परीषद सदस्या सुनिता गावडे, घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्रदादा गावडे, संचालक सोपानराव भाकरे, गुणोरे गावचे माजी सरपंच सुभाष खोसे, प्रगतीशील शेतकरी व मंळगंगा पतसस्थेचे माजी संचालक रामदास पांढरकर, प्रशासकीय अधिकारी शिवाजी बोखारे, , भाजपाचे उपाध्यक्ष सावित्राशेठ थोरात, बाबाजी निचित,सरपंच बिपीन थिटे, पारनेर तालुका पत्रकार संघाचे ज्येष्ठ मार्गदर्शक दत्ता उनवणे,शिरूर तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संजय बारहाते, सेवानिवृत्त प्राचार्य रामचंद्र महाराज सुपेकर, चांदाशेठ गावडे, अशोक माशेरे, प्रभाकर खोमणे, मिना शाखा कालवा सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रकाश वायसे, चेअरमन सोनभाऊ मुसळे, सरपंच विक्रम निचित, कचरदास बोचरे, प्रकाश भाकरे,पोपट बोराडे, सखाराम खामकर, माजी सरपंच दिपक दुडे, बबनराव पोकळे, आण्णा पळसकर, रखमा निचित, पोपट जाधव , थोरात गुरुजी, बन्सी खाडे, देविदास पवार, बापुसाहेब होने, गोरक्षणाथ ईरोळे,संगीता ईरोळे,मनिषा बारहाते यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.
माजी आमदार गावडे यांनी १९६२ चा शैक्षणिक काळ व आजची शैक्षणिक पद्धत याविषयी बोलताना सांगितले आज विद्यार्थी हा सोशल मिडीयामुळे हायटेक झाला असून विद्यार्थ्यांना सर्व सुविधा मिळत आहेत. पुर्वी शिक्षणासाठी पाच ते सहा किलोमीटर पायी जावे लागत असे तेव्हा शिक्षण मिळत असे. विद्यार्थ्यांनी या शिक्षण सुविधेचा फायदा घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन त्यांनी व्यक्त केले आहे.
बापूसाहेब गावडे महाविद्यालयाचे प्राचार्य आर बी गावडे यांनी यावेळी सांगितले माजी आमदार पोपटराव गावडे यांनी शिक्षण संस्थेची स्थापना केली म्हणून पारनेर शिरुर तालुक्यातील विद्यार्थी मोठ्या प्रमाणात अधिकारी झाले असून तालुक्याचा नावलौकिक राज्यात झाला आहे.
यावेळी विविध संस्था व्यक्ती यांच्या वतीने या यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. बापूसाहेब होणे यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले शेवटी पत्रकार संजय बारहाते यांनी आभार मानले.

Post a Comment