शेतकरी प्रश्न , अनुदान याबाबत माजी आमदार गप्प का .... रस्तापूरमध्ये तीन कोटी 49 लाख रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन....


चांदा : नेवासा तालुक्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना पीकविमा व नुकसान भरपाई व अनुदान मिळाले नाही . काल वादळाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले यावर माजी आमदार का शांत बसून आहे. त्यांच्या पक्षाचे सरकार असूनही गप्प आहेत नेवासा तालुक्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळाला नाही तर रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे माजी मंत्री आमदार शंकरराव गडाख यांनी सांगितले.


स्तापुर ता नेवासा येथे जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती 2 कोटी 9 लक्ष रु,मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत रस्तापुर हिंगळादेवी रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणं करणे 2 कोटी 14 लक्ष रु,अर्थ संकल्प
2020/2021 अंतर्गत रस्तापुर ,चांदा रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरणं करणे 1 कोटी 26 लक्ष असे एकूण 3 कोटी 49 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण आ शंकरराव गडाख यांच्या हस्ते संपन्न झाले.


आ गडाख म्हणाले रस्तापूर व परिसराच्या विकासासाठी मी कटिबध्द आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळामुळे नेवासा तालुक्यातील विविध गावामधील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झालेले आहे. केळी, डाळिंब या फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.अनेक घरांची पडझड होऊन अनेकांचे प्रपंच उघड्यावर आलेले आहेत. 


सदर पंचनामे तातडीने करावे यासाठी प्रशासनाला व्यक्तिगत सूचना केलेल्या आहेत व सदर पंचनामे 2 दिवसांत पूर्ण करण्याची मागणी  केली आहे . कुठे प्रशासनाने पंचनामे करण्यास  अडचण केली तर थेट संपर्क करावा असे आ . शंकरराव गडाख म्हणाले.

तालुक्यातील विकासकामांत खोडा घालण्यासाठी सत्तेचा वापर करण्याऱ्या माजी लोकप्रतिनिधीने शेतकऱ्यांच्या प्रश्नांची खरच काळजी असेल तर शासनदरबारी प्रयत्न करून शेतकऱ्यांना तातडीची मदत आणण्यासाठी प्रयत्न करावे राज्यात  सरकार  त्यांचे आहे असेही आ शंकरराव गडाख म्हणाले. 


याप्रसंगी रस्तापुर,चांदा,ब-हाणपुर व परिसरातील ग्रामस्थ,विविध संस्थाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.एकाच वेळी तब्बल 3 कोटी 49 लक्ष रुपयांचे कामे रस्तापुर मध्ये आ शंकरराव गडाख यांच्या प्रयत्नातुन मार्गी लागल्याने आ गडाख यांचे रस्तापूर ग्रामस्थांनी आभार मानले.

आ शंकरराव गडाख यांनी प्रशासनास सूचना दिली आहे कि तालुक्यातील गावा ,गावात झालेल्या नुकसानीचे पंचनामे 2 दिवसात पूर्ण करा  अन्यथा तालुक्यातील शेतकऱ्यांसह प्रशासनाला जाब विचारण्यात येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post