मान्सून सक्रीय... या जिल्ह्यात पडणार पाऊस....

मु़ंबई : मागील दोन दिवसांपासून महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून पावसाची संततधार सुरू आहे.


मुंबईसह पालघर, ठाणे या जिल्ह्यांसाठी मंगळवारी व बुधवारी ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे. रायगडसाठी पुढील चारही दिवस, तर रत्नागिरीसाठी मंगळवारपर्यंत ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.  

सिंधुदुर्गात मंगळवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता असल्याचं हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. मध्य महाराष्ट्रातही पुढील ४८ तास मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post