कर्जत : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघात नेहमीच कोणता ना कोणता विषय चर्चेत असतो. कर्जत-जामखेड तालुक्यापासून ते थेट मुंबई पर्यंत विषय चर्चिला जात असतो. तसाच नवीन विषय चर्चेत आलेला आहे.
रोहित पवार यांनी आमदार राम शिंदे व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व खासदार सुजय विखे पाटील विखे पाटील यांना घरगुती कार्यक्रमाचे निमंत्रण देऊन आमंत्रित केले आहे. हे आमंत्रण सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेले आहे.
कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार रहिवाशी झालेले आहेत. पूर्वीच तालुक्यातील एका गावात त्यांनी शेती खरेदी केली आहे. आता कर्जत शहरात त्यांनी बंगला बांधला आहे.
मंगळवारी पूजा ठेवली आहे. याची निमंत्रणे त्यांनी विरोधीपक्षातील नेत्यांना जाहीरपणे पाठविली आहेत. या मतदारसंघातून विजयी झाल्यानंतर ‘बाहेरचे पार्सल’ म्हणून विरोधकांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे.
मात्र आता आमदार रोहित पवार हे कर्जतचे रहिवासी झालेले आहेत. त्यांनी येथे बंगला उभारलेला आहे.आमदार पवार यांनी दिनकर या आपल्या बंगल्याचे आणि त्याला जोडूनच असलेल्या कार्यालयाचे उद्घाटनाचा जाहीर कार्यक्रम ठेवत आपण आता कर्जतकर झाल्याचे संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.
या कार्यक्रमांची निमंत्रणे नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील आणि विधान परिषदेचे आमदार राम शिंदे यांना ट्विटरच्या माध्यमातून जाहीरपणे दिली आहेत. या निमंत्रणावरून कार्यक्रमाला आजारी लावतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
आमदार रोहित पवार यांनी मान्यवरांना समाज माध्यमातून निमंत्रित केलेले आहे. त्यामुळे आता मान्यवर मंडळीआगरी लावतात की समाज माध्यमातूनच शुभेच्छा देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या निमंत्रणाची मात्र मतदारसंघासह संपूर्ण जिल्हा व राज्यात चर्चा सुरू झालेली आहे.
ही चर्चा सर्वांच्या दृष्टीने घातक ठरणारी आहेत्यामुळे वेळीच आता ठोस उपाय योजना करणे गरजेचे आहे.
Post a Comment