कुकडीच्या पाण्यावरून महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये हमरीतुमरी....

 अमर छत्तीसे 

श्रीगोंदा : कुकडीच्या आवर्तनातून आपल्या गावाला पाणी मिळाले पाहिजे. यासाठी महाविकास आघाडीच्या दोन नेत्यांमध्ये चांगलीच हमरीतुमरी झाल्याची तालुक्यात चर्चा आहे. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्यपातळीवर पदाधिकारी असणारे व दुसरे कॉंग्रेसचे जिल्हा पातळीवर पक्षीय पदाधिकारी असणाऱ्या नेत्यांमध्ये वाद झाला आहे.


कुकडीचे आवर्तन चालू असताना तालुक्यातील पूर्व भागातील गावातील वितरिकेंना मुबलक पाणी मिळाले नाही. पालकमंत्री व खासदार यांच्याकडे पाठपुरावा करून पाण्याचा कालावधी तीन दिवसांनी वाढवल्याचा दावा महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांनी केला हे पाणी आले. 

पण यात याच आघाडीतील नेत्यांमध्ये वाद निर्माण झाला. माझ्या गावाला पाणी घेऊन जाणार अशी भूमिका कॉंग्रेसच्या जिल्हास्तरीय पक्षीय पदाधिकारी घेतली. त्यास राष्ट्रवादीच्या राज्यस्तरीय नेत्याने विरोध केला. यावरून दोघांच्यात चांगलीच हमरीतुमरी झाली असल्याची चर्चा तालुक्यात आहे. 

हे दोघेही तालुक्यात एकाच माजी लोकप्रतिनिधी चे चांगले मित्र आहेत. पण आपल्या गावाला पाणी मिळाले पाहिजे. यासाठी दोघांनीही चांगलीच कसरत केल्याचे दिसते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post