अमर छत्तीसे
श्रीगोंदा : श्रीगोंदा पंचायत समितीतील एका खाजगी संगणक चालकाने मारलेल्या डल्याची व्याप्ती मोठी असल्याची चर्चा सध्या तालुक्यात सुरु आहे. चर्चा घडत असली तरी प्रशासनाकडून यावर उघडपणे बोलले जात नसल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खाजगी संगणक चालकाने आढळगाव जिल्हा परिषद गटातील एका बड्या गावालाही चुना लावल्याची दबक्या आवाजात चर्चा आहे. याबाबत अनेकांनी पंचायत समितीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून माहिती घेण्याचा प्रयत्न केला मात्र माहिती मिळू शकली नसल्याची तालुक्यात चर्चा सुरु आहे.
सध्या १५वा वित्त आयोगाचा निधी सरपंच व ग्रामसेवक यांच्या संयुक्त खात्यावर असतो. सध्या डिजिटल युग असल्यामुळे एखाद्या प्रशिक्षित व्यक्ती कडून झालेल्या कामाची बिले सोडण्यासाठी डिजीटल स्वाक्षरी त्या व्यक्तीला दिली जाते.
या व्यक्तीची नियुक्ती जिल्हा परिषद व पंचायत समिती यांनी केली आहे. या खाजगी संगणक चालकाने एका ग्रामपंचायतचे परस्पर १०लाख स्वतःच्या खात्यावर वर्ग करुन घेतले. याचा बोभाटा झाल्यावर संबंधीत ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक व सरपंच यांनी त्याचे घर गाठून ती रक्कम वसूल करून घेतली.
याबाबत प्रभारी गटविकास अधिकारी राम जगताप यांच्याकडे तक्रार आहे करण्यात आली. त्यांनी या तक्रारीची दखल घेतली आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी चौकशी समिती नेमतो असे प्रशासकीय उत्तर दिले.
संबंधीत खासगी संगणक चालकाने आढळगाव जिल्हा परिषद गटातील दोन ग्रामपंचायतीमध्ये ही घोटाळा घातला असल्याची तालुक्यात चर्चा सुरु आहे. याबाबतची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती असल्याची चर्चा तालुक्यात सुरू झालेली आहे. परंतु श्रीगोंदा पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी याबाबत कानावर हात ठेवले आहे.
प्रभारी गटविकास अधिकार्यांनी या प्रकरणाची चौकशी करून कारवाई करु असे सांगितले होते. पण ना चौकशी ना कारवाई थेट कर्जतला बदली दिली आहे. त्यामुळे एका नावकर्याने दुसऱ्या नावकर्याला पाठबळ दिल्याची चर्चा श्रीगोंदा पंचायत समितीच्या आवारात सुरू आहे.
तालुक्यातील एका ग्रामपंचायतीच्या खात्यावरील १०लाख रुपयांची रक्कम परस्पर स्वतः च्या खात्यावर खाजगी संगणक चालकाची ना चौकशी ना गुन्हा दाखल झालेला नाही. या प्रकरणाबाबत संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात काही अधिकार्यांचा हात असण्याची शक्यताव्यक्त केली जात आहे. याकडे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आशिष येरेकर लक्ष देणार का?असा सवाल उपस्थित होत आहे.

Post a Comment