नगर ः मरणोत्तर नेत्रदान करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा नेत्र शल्यचिकित्सक डाॅ. संतोष रासकर यांनी केले.
३८ वा राष्ट्रीय नेत्रदान पंधरवडा साजरा करण्यात आला. नाशिक डायोसेसन कौन्सिल पी. टी. आर डी -२ नाशिक या संस्थेच्या प्रगतकला महाविद्यालयात अहमदनगर येथे नेत्रदान चित्रकला, घोषवाक्यासह पोस्टर्स यांनी साजरा करण्यात आला.
या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. संजय घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. या वेळी जिल्हा नेत्रदान समुपदेशक सतीष आहिरे, प्राचार्य प्रा. महावीर सोनटक्के, प्रा. नुरील भोसले, दिनेश अष्टेकर, चंद्रकांत देठे, सचिन साळवी, किरण मते, महाजन सर व एकूण २५ विद्यार्थ्यांनी उस्फूर्त सहभाग घेतला.
सतिष आहिरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. प्राचार्य महावीर सोनटक्के यांनी या नेत्रदान उपक्रमाचे अभिनंदन करत नेत्र विभागाला महाविद्यालयाचे सदोदित सहकार्य राहिल व पुढील नेत्रसेवा कार्यास शुभेच्छा देत सर्वांचे आभार मानले.
Post a Comment