या शिक्षकांना मिळाला पुरस्कार....

नगर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने देण्यात येणार्‍या 14 जिल्हा पुरस्कारांसह दोन केंद्र प्रमुखांची निवड सोमवारी जाहीर करण्यात आली. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी 14 प्राथमिक शिक्षकांच्या नावावर शिक्कामोहर्तब केले असून 2 केंद्रप्रमुख यांची जिल्हा परिषद पातळीवर निवड करण्यात आली आहे. 


जिल्हा परिषद
 प्राथमिक शिक्षण विभागाच्यावतीने जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्राथमिक शिक्षकांचे स्वमुल्यमापन व 25 गुणांची लेखी परीक्षा घेऊन निवड जाहीर करण्यात येते. यासाठी महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर शिक्षकांसाठी 100 गुणांची स्वमुल्यमानाची पत्रिका टाकण्यात आली होती. तालुकानिहाय शिक्षकांनी या पत्रिकेत माहिती भरून ती पंचायत समितीकडे सादर केली होती. 

या स्वयंमुल्यमान पत्रिकेनुसार गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी शिक्षण यांनी संबंधीत शिक्षकांनी भरून दिलेल्या माहितीची पडताळणी केली. त्यानंतर प्रत्येक तालुक्यातून तीन शिक्षकांचे प्रस्ताव जिल्हास्तरावर पाठवण्यात आले. आलेल्या प्रस्तवातील शिक्षकांची 25 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात आली. 

त्यानंतर 100 गुणांची स्व मुल्यमापन आणि 25 लेखी परीक्षेचे गुण यात सर्वाधिक गुण मिळवणार्‍या प्रत्येक तालुक्यातून एक या प्रमाणे 14 शिक्षकांची निवड करून ती मान्यतेसाठी विभागीय आयुक्त यांच्याकडे पाठवण्यात आली. विभागीय आयुक्त गमे यांनी 14 शिक्षकांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. 

जिल्हा पातळीवर मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर व शिक्षणाधिकारी भास्कर जाधव यांच्या समितीने काम पाहिले. यासह जिल्हा परिषद पातळीवर दोन केंद्र प्रमुख्यांची पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.

विभागीय महसूल आयुक्त यांनी सोमवारी दुपारी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निवड समितीने अंतिम करून पाठवलेल्या जिल्हा शिक्षक पुरस्कारांच्या निवडीवर शिक्कामोर्हतब केले. तर जिल्हा परिषद पातळीवर उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यातील केंद्र प्रमुखांची निवडी जाहीर करण्यात आली.

हे आहेत पुरस्कारार्थी : नरेंद्र खंडू राठोड जि.प. शाळा तिर्थाचीवाडी (अकोले), सोमनाथ बबनराव घुले जि.प. शाळा पिंपळगावमाथा (संगमनेर), सचिन भिमराव अढांगळे जि.प. बहादरपूर (कोपरगाव), भारती दिंगबर देशमुख जि. प. शाळा खर्डेपाटोळे (राहाता), सविता विठ्ठलराव सांळुके जि.प. शाळा गोंडेगाव (श्रीरामपूर), अनिल नामदेव कल्हापूरे जि.प. शाळा पिंपरी अवघड (राहुरी), सुनिता भाऊसाहेब निकम जि.प. शाळा भालगाव (नेवासा), अंजली तुकाराम चव्हाण जि.प. शाळा बोधेगाव (शेवगाव), भागिनाथ नामदेव बडे जि.प. शाळा सामठाणे नलवडे (पाथर्डी), एकनाथ पंढरीनाथ चव्हाण, जि.प. बसरवाडी शाळा बोधेगाव (जामखेड), किरण रामराव मुळे, जि.प. बर्गेवाडी शाळा (कर्जत), जाविद आदमभाऊ सय्यद जि.प. बसरवाडी शाळा मढेवडगाव (श्रीगोंदा), विजय भिमराव गुंजाळ जि.प. सांगवीसुर्या शाळा (पारनेर ), साधना जयवंत क्षीरसागर जि.प. शाळा कौडगाव (नगर) आणि केंद्र प्रमुख उत्तर जिल्हा अशोक कारभारी विटनोर श्रीरामपूर आणि दक्षिण नगर जिल्हा रावजी तबा केसरकर पारनेर यांचा समावेश आहे.

लवकरच जिल्हा परिषदेच्यावतीने विशेष समारंभाचे आयोजन करण्यात येऊन निवड झालेल्या शिक्षकांचा गौरव करण्यात येणार आहे.


 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post