विधानसभेतील जेष्ठ व अभ्यासू आमदार लोकनेते बबनराव (दादा) पाचपुते ....

पंचायत समिती  सदस्य ,आमदार ,राज्याचे गृहराज्यमंत्री ,वनमंत्री ,आदिवासी मंत्री ते विधानसभेत २०१९ ला पहिल्यांदा शपथविधी साठी बहुमान मिळणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे बबनराव पाचपुते होय 


दादा आपल्या राजकीय कार्यकीर्दीत आठ वेळा विधानसभेच्या निवडणुकीत वेगवेगळ्या चिन्हावर रिंगणात उतरले आणि तब्बल सहा वेळा प्रतिस्पर्धी याना चितपट करून विधानसभेत प्रवेश केला जवळपास ३० वर्षांचा  प्रदीर्घ  दांडगा अनुभव असणारे व्यक्तिमत्व म्हणजे दादा आहेत २०१९ च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर विधानसभेत आमदारांनाचा शपथविधी होता असताना सर्वात पहिल्यांदा शपथ घेण्याचा बहुमान मिळाला व राज्यात दादांच्यामुळे श्रीगोंद्याची मान उंचावली 

चांद्यापासून बांद्यापर्यंत दांडगा जनसंपर्क असणारे व्यक्तिमत्व म्हणजे दादा होय दादा राजकारणाच्या रणांगणात महाविद्यालयीन काळातच सक्रिय झाले होते विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर लढा उभा केला व पुढच्या काळात शेतकऱ्याच्या प्रश्नावर लढा उभा केला. त्यानंतर दादांच्या कार्यकर्त्यांना विधानसभेचे वेध लागले व कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर १९८० ची विधानसभा निवडणूक जाहीर झाली त्यावेळी जनता पार्टीच्या चिन्हावर निवडणूक लढवली व कोग्रेस ला विरोध करून शानदार विजय मिळविला.

विधानसभेत प्रवेश केला या विजयाची घोडदौड पुढे अविरत चालू राहिली दोन अपवाद वगळता दादा सहा वेळा विधानसभेत गेले त्याठिकाणी स्वतःच्या वक्तृत्वाचा व कर्तृत्वाचा ठसा उमटवून राज्यात ओळख निर्माण केली त्याचाच फायदा पुढे राज्याचे गृहराज्यमंत्री ते राज्याचे कॅबिनेट मंत्री पदापर्यंत काम करण्यात झाला राज्यात पहिल्यांदा बिगर आदिवासी मंत्र्याकडे आदिवाशी खाते देण्यात आले या खात्यातही अतिशय चांगले काम दादांनी केले . 

त्यानंतर च्या राजकीय घडामोडीत सध्या विरोधी पक्ष नेते व माजी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची व दादांची जुनी मैत्री असल्यामुळे २०१४ ला दादांनी भाजप मध्ये प्रवेश केला पण दुर्दैवाने २०१४ ला दादांचा पराभव झाला. पण पराभवाच्या दुसऱ्या दिवशी जनतेच्या सुखदुःखात मिसळणारा नेता म्हणजे बबनराव पाचपुते होय. 

या काळात स्वतः आमदार नसताना राज्यात व केंद्रात स्वपक्षाचे सरकार असल्यामुळे विकासाची घोडदौड सुरूच ठेवली सत्तेच्या माध्यमातून श्रीगोंदा तालुका व शहरासाठी कोट्यवधी चा निधी आणला याच विकासाच्या दृष्टीकोनातून २०१९ चा विजय दादांना संपादन करता आला आहे २०१९ च्या निवडणुकीत भाजप चिन्हावर निवडणूक लढवून विजय संपादन केला व पुन्हा विकासाची घोडदौड सुरु झझ्झझाली आहे अश्या विकासात्मक दृष्टीकोन असणाऱ्या लोकनेत्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छया . 

राजकारणी ते प्रवचनकार 

दादांनी राजकर्णाबरोबर अध्यात्माचा गाढा अभ्यास केला आहे पंढरपूर ची वारी न चुकता करणारा राज्यातील एकमेव नेता म्हणून दादांची ओळख आहे आपल्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढून प्रवचन करण्याचे कामही दादा करतात त्यांच्या माध्यमातून राज्याला अभ्यासू राजकारण्याबरोबर एक उत्कृस्ट प्रवचनकार मिळाला आहे 



शब्दांकन : संदिप नागवडे सर (भाजप तालुका अध्यक्ष श्रीगोंदा)

Post a Comment

Previous Post Next Post