श्रीगोंदा : जिल्ह्यातील एका मोठ्या गावातील गाव पुढारी जे विधानसभा निवडणुकीत पाहुण्याची पालखी मिरवत होते. ते विद्यमान आमदारांकडे यांच्याकडे निधी मागण्यासाठी गेले असता आमदारांनी संबधित स्वयंभू नेत्यांची चांगलीच कान उघडणी केली असल्याची चर्चा सुरू आहे.
जिल्ह्यातील एका तालुक्यातील पूर्व भागातील एका बड्या गावातील काही मंडळी गावातील मंदिरासाठी निधी मागण्यासाठी आमदारांकडे गेले होते. यावेळी आमदारांनी संबंधिता़ंची कानघडणी केली.
गेल्या 40 वर्षात आपल्या गावातून मतदानात कमी पडले नाही व माजी मंत्रीही विकास कामात कमी पडले नाहीत. मग या निवडणुकीत नेमके आमचे चुकले काय तुमच्या पैकी बहुतांशी पार्टी व नातेगोते सांभाळत होते.
माझ्याकडे प्रत्येक गावात काय चालले आहे याची माहिती असते. पण जे लोक निवडणुकीत विरोधात वागतात त्यांनाच आपले माणसे विकास निधी मागण्यासाठी घेऊन येतात. ही खेदाची बाब आहे.
ग्रामदैवताला माजी मंत्र्याकडून काहीका होईना निधी भेटला आहे. पण ना कुठे बोर्ड ना नाव तरीही या जागृत देवस्थानसाठी निधी देण्याची व्यवस्था करू असे आश्वासन घेऊन गावपुढारी परतले.
जिल्ह्यातील एका तालुक्यातील एका मोठ्या गावात दबक्या आवाजात चर्चा चालू आहे. त्याचबरोबर जे समर्थक इतर लोकांना घेऊन आले होते. त्यांच्या विषयी ही आमदार महोदयांनी नाराजी व्यक्त केली.
आमदार महोदया़ंनी त्या लोकांची कान उघाडणी केल्याची तालुक्यात चांगलीच चर्चा होती. त्या तालुक्यातील पूर्व भागातील गाव असून त्या गावात ते नेते पोहचण्याच्या आतच चर्चा सुरू होती.
Post a Comment