शरद पवार गटाला नीलेश लंके परतण्याची आशा...

नगर ः  अहमदनगर लोकसभा मतदारसंघची जागा शरद पवार गट लढविणार आहे. आगामी निवडणुकीत उमेदवार कोण असावा, यावर या बैठकीत चर्चा करण्यात आलेली आहे. यामध्ये काही नावांची चर्चा झालेी असली तरी  आमदार नीलेश लंके हे पुन्हा शरद पवार गटातील येऊन या मतदारसंघातून उमेदवारी करतील, अशी आशा आहे. त्यानुसार त्यांनी दसऱ्यापर्यंत मुदतही दिलेली आहे.


प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर  व शिर्डी मतदारसंघातील आढावा बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीला राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, पक्ष निरीक्षक अंकुश काकडे, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, प्रताप ढाकणे, अरुण कडू, अभिषेक कळमकर आदी उपस्थित होते. 

या बैठकीत आमदार रोहित पवार, आमदार प्राजक्त तनपुरे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, डाॅ. अनिल आठरे आदींना उमेदवारी द्यावी, अशी चर्चा झाली. यामध्ये अजित पवार गटातील आमदार नीलेश लंके यांच्या नावाचीही चर्चा झाली. 

सध्या अहमदनगर मतदारसंघात लंके यांचा दांडगा संपर्क असून त्यांनी आपल्या गटात दाखल व्हावे व उमेदवारी करावी, अशी अपेक्षा बैठकीत काहींनी व्यक्त केली. त्यानुसार दसऱ्यापर्यंत लंके यांनी जाहीरपणे प्रवेश केल्यास त्याना उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा झाली आहे.

या बैठकीत तसे सूतोवाच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलेले आहे. त्यामुळे आता लंके यांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. लंके शरद पवार गटात गेल्यास त्याचा निश्चित फायदा सर्वांना होणार आहे. 

सध्या मतदारसंघात खासदार सुजय विखे यांच्या विरुध्द आमदार नीलेश लंके यांच्यातील लढतीची चर्चा खरी ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे. आता लंके अजित पवार गटात राहतात की शरद पवार गटात जातात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post