मोहटादेवी मंदिरावर खासदार विखेकडून हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी.. २०२४ ला पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होऊ दे असे देवीला घातले साकडे..

पाथर्डी  ः शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे यांनी मोहटादेवी गडावर मंदिराच्या कळसावर हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी केली आहे. मोहटादेवीचे खासदार विखे आणि आमदार राजळे यांनी दर्शन घेऊन पूजा करून आरती केली.


यंदाच्या नवरात्री उत्सवाच्या निमित्ताने मोहटादेवी मंदिर परिसरात काहीतरी नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्याचे मनात होते. आज त्या संकल्पनेची पूर्ती झाली आहे. याआधी देखील कधीही न राबविण्यात आलेले अनेकविध उपक्रम राबविण्यासाठी मी नेहमी प्राधान्य दिले आहे. 


मोहटादेवीचे आमच्या मनात एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे आमदार मोनिका राजळे यांच्यासमवेत मंदिराच्या कळसावर पुष्पवृष्टी करून देवीची आराधना करण्याचं काम केलं असल्याचं खासदार सुजय विखे पाटील यांनी यावेळी सांगितले.

संपूर्ण जिराईत भागातील शेतकरी हा सुखावला गेला पाहिजे, पाऊस आणि अतिवृष्टी यामुळे उद्भवणाऱ्या नैसर्गिक संकटांपासून समाजाला दूर ठेवणे नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदा देशाचे पंतप्रधान व्हावेत असं साकडं देवीला घातलं आहे, असे खासदार विखे म्हणाले. 

यावेळी अभय आव्हाड,अजय रक्ताटे, बंडूशेठ बोरूडे, अॅड प्रतीक खेडकर,संजय बडे, भगवान आव्हाड,धनंजय बडे अविनाश फुंदे,संदीप पालवे उपस्थित होते. विश्वस्त अनुराधा केदार,देवस्थान समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे यांनी स्वागत केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post