नगर ः नऊ दिवस देवीची नऊ रूपांची पूजा केली जाते.वर्षातून चार वेळा नवरात्री येते परंतु दोन नवरात्री गुपीत स्वरूपात साजरे होतात.तर चैत्र आणि शारदिय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात.अश्विन महिन्यात येणाऱ्या नवरात्राला शारदीय नवरात्र असे म्हटले जाते.
धार्मिक ग्रथांनुसार, दुर्गा पूजनासाठी शारदीय नवरात्र सर्वश्रेष्ठ मानले गाले आहे.शारदीय नवरात्रीचे नऊही दिवस अत्यंत पवित्र आणि शुभ मानले गेले आहेत.नवरात्रात केलेल्या देवी पूजनामुळे शक्ती,ज्ञान, आनंद,सुख,समृद्धी,समाधान,कीर्ती,मान,सन्
भगवती देवीच्या पूजनामुळे कुटुंबात सुख,शांतता नांदते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी दुर्गा पूजनासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. हिंदू धर्मात नवरात्री अर्थात घटस्थापने दरम्यान संपूर्ण देशभरात देवीची पूजा केली जाते. नवरात्री दरम्यान नऊ दिवस उपवास व देवीची पूजा अर्चना करतात.
नवरात्रीचे नऊ दिवस नऊ रंगांचे कपडे घालण्याचे विशेष महत्त्व आहे.मात्र याला पुराणात आधार नाही हे अलीकडे १० वर्षाच्या काळात आले आहे . या दिवशी महिला त्या त्या रंगाच्या साड्या, ड्रेस परिधान करतात तर बहुसंख्य मंदिरात त्याच कलरची साडी देवीला नेसवली जाते
याला शास्त्रीय आधार नसला तरी सगळीकडे एकसारखा रंगाची साडी, ड्रेस महिलांनी परिधान केलेला असतो.
सामाजिक एकता,भेदाभेद दिसत नाही आम्ही सर्व महिला एक आहोत हा संदेश मात्र त्यातून जातो,नवरात्रीच्या पहिल्या दिवसाचा रंग कोणत्या दिवसापासून नवरात्र सुरू होतो यावर आधारित असतो.
Post a Comment