राम शिंदे यांच्याविषयी मनात वेगळी आस्था...

पाथर्डी ः आमदार शिंदे हे पालकमंत्री असताना मला त्यांनी राजकीय जीवनात पक्षाचा विचार न करता फार मदत केली. त्यांच्याविषयी माझ्या मनात वेगळी आस्था आहे. त्यामुळे मी त्यांची गाडी चालवायला बसलो याचा मला आनंद आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.


श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर आमदार राम शिंदे त्यांच्या पत्नी आशा शिंदे यांनी सह पत्नीत देवीची पूजा करून आरती केली. यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, अर्जुन धायतडक आदी उपस्थित होते. 

आ. शिंदे व आ. लंके यांचे देवस्थान समितीचे विश्वस्त शशिकांत दहिफळे, डॉ. श्रीधर देशमुख, अक्षय गोसावी, विठ्ठल कुटे, अनुराधा केदार, डॉ.ज्योती देशमुख, पोपट फुंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश भणगे, भिमराव खाडे यांनी स्वागत करून सन्मान केला. शिंदे व लंके श्रीक्षेत्र मोहटादेवी चरणी नतमस्तक होण्यासाठी आले असता केले. विशेष म्हणजे त्यांच्या वाहन आमदार निलेश लंके चालवत होते. त्यावेळी ते बोलत होते. 

लंके म्हणाले की, मागच्या कालखंडात आम्ही वेगवेगळ्या पक्षाच्या मत प्रवाहात होतो, तरी पण आम्ही पक्ष बंधने सांभाळून प्रेम जपले आहे. आता आम्ही महायुतीत आल्याने आम्ही एकत्र आलो आहे. एवढेच या निमित्ताने संकेत आहे.
कोणाला काय समजायचं तो ज्याचा त्याचा विषय आहे.मोहटादेवीचं आम्हाला एकत्र बोलावणं आलं म्हणून आम्ही एकत्रित देवीचे दर्शनाला आलो, हा आमच्यासाठी भाग्याचा दिवस असल्याचाही  लंके म्हणाले.\

दरम्यान श्रीक्षेत्र मोहटादेवी गडावर मोहटादेवीच्या दर्शनासाठी आमदार नीलेश लंके गाडी चालवत तर त्यांच्या बाजूला आमदार राम शिंदे बसून देवीच्या दर्शनासाठी आले. या दोन्ही आमदारांना सोबत पाहताच तेथे उपस्थित असणाऱ्यांच्या भुवया उंचावल्या. यावरून जिल्हाभर राजकीय चर्चांना उधाण आले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post