पाथर्डी ः ज्या घराण्याने पन्नास साठ वर्ष या राज्यातील सत्ता उपभोगली,त्यांनी परत साठ वर्षानंतर युवा संघर्ष यात्रा काढावी लागली ही दयनीय बाब आहे, अशी टीका आमदार रोहित पवार यांनी सुरू केलेली युवा संघर्ष यात्रेवर केली.
श्री क्षेत्र मोहटादेवी गडावर आमदार राम शिंदे त्यांच्या पत्नी आशा शिंदे यांनी सह पत्नीत देवीची पूजा करून आरती केली. यावेळी आमदार नीलेश लंके, भाजपचे तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, माजी नगराध्यक्ष डॉ. मृत्यूंजय गर्जे, अर्जुन धायतडक आदी उपस्थित होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. या प्रसंगी शिंदे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
शिंदे म्हणाले की, रोहित पवार यांनी आपली ऐतिहासिक स्थिती पडताळून पाहण्याची गरज आहे. त्यांचे दाखवायचे दात वेगळे व खायचे दात वेगळे आहेत. जनता आता त्यांना ओळखून आहे. हातात सत्ता असताना काही करायचं नाही आणि दुसऱ्यांनी केलं नाही, त्यावेळी बोंबा मारण्याचे काम करायचे असे ते म्हणाले.
शिंदे म्हणाले की, कर्जत- जामखेडचे लोकप्रतिनिधीनी शंभर, दीडशे पीए ठेवले. मात्र एकही कर्जत-जामखेड मधील ठेवला नाही. ज्या जनतेने तुम्हाला विधानसभेत पाठवले त्यांच्यावर तुमचा विश्वास नाही का? इथे युवा संघर्ष दिसला नाही का? असा सवाल शिंदे यांनी रोहित पवार यांना विचारला आहे.
रोहितपवार यांच्या संघर्ष युवा यात्रेला गांभीर्याने घेण्याची गरज नाही, अशी टीका आमदार राम शिंदे यांनी रोहित पवार यांच्या संघर्ष युवा यात्रेवर केलेली आहे. या टीकेमुळेच एकच खळबळ उडली आहे.
शिंदे म्हणाले लोकसभेच्या उमेदवारीसाठी मी पक्षाकडे इच्छा व्यक्त केली असून मी माझ्या इच्छेवर ठाम आहे.२०१४ मध्ये पक्षाने तिकीट दिले नाही.२०१९ ला मी घेतले नाही. मात्र आता २०२४ च्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मी तयार आहे.
यावर पक्ष आणि नेतृत्वाने निर्णय घ्यायचा आहे. भाजपामध्येच २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी अजून एकप्रतिस्पर्धी निवडणुक लढवण्यास तयार आहे, असे शिंदे यांनी या वेळी म्हटले आहे.
Post a Comment